आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Money Saving: Not Permission Take Junior Officer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता ‘गाड्यासोबत नाड्याची यात्रा’ प्रकार होणार बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मंत्रालयातीलविविध बैठकींना उपस्थित राहताना आता वरिष्ठ अधिका-यांना पूर्ण तयारी करावी लागणार आहे. यापुढे बैठकीला कनिष्ठ अधिका-यांना सोबत आणण्यास शासनाने सक्त मनाई केली आहे. त्यामुळे आता ‘गाड्यासोबत, नाड्याची यात्रा’ हा प्रकार बंद होणार आहे. जलसंपदा विभागाने या अनुषंगाने एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
तसेच क्षेत्रीय स्तरावरील कामाचा खोळंबा होता. ही बाब लक्षात घेऊनच जलसंपदा विभागाने उच्चस्तरीय बैठकांना कनिष्ठ अधिका-यांना सोबत आणण्याच्या अनुषंगाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

१३ जानेवारी २०१५ ला प्रसिद्ध केलेल्या या परिपत्रकानुसार ज्या अधिका-यांना निमंत्रित केले, त्याच अधिका-याला उपस्थित राहावे लागेल. या अधिका-याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही अधिका-याला बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. आता यापुढे कार्यकारी संचालक आणि मुख्य अभियंता यांना एकाच वेळी बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. कार्यकारी संचालक उपस्थित राहणार असतील, तर मुख्य अभियंत्याला उपस्थित राहता येणार नाही. कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही अधिका-याला उच्चस्तरीय बैठकीत उपस्थित राहता येणार नाही. आता यापुढे बैठकीला उपस्थित राहणा-या अधिका-यांना पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच बैठकीचे कार्यवृत्त त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी तयार करून अध्यक्षांची मान्यता घेऊन एकाच आठवड्यात निर्गमित करावे लागणार आहे. त्यामुळे कामाला गती येणार आहे. तूर्तास अशा प्रकारचे परिपत्रक जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केले आहे. अद्याप इतर विभागांनी असे परिपत्रक प्रसिद्ध केलेले नाही.

‘साहेबांना’ जास्त करावा लागेल अभ्यास
यापूर्वीमंत्रालयात होणा-या उच्चस्तरीय बैठकीत वरिष्ठ अधिका-यांना निमंत्रित केले जात होते. मात्र, वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासोबत कनिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित राहतात. त्यामुळे ‘साहेबांना’ जास्त अभ्यास करावा लागत नाही. कनिष्ठ अधिका-याच्या भरवशावर वरिष्ठ अधिकारी माहिती पुरवतात. या प्रकारामुळे अनेकदा अडचणी निर्माण झाल्या आहेत.