आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ते' माकड अखेर जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला/अकोट- मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या अकोटमधील पिसाळलेल्या माकडाच्या प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला. आज, २० जूनला राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेत दुपारी ४.३० ला सिंधी कॅम्प परिसरात त्याला पकडण्यात आले. माकड पकडल्याचे वृत्त अकोट शहरात पसरताच त्याला पाहण्यासाठी एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे नागरिकांनी गर्दी केली होती. "दिव्य मराठी'ने माकडाच्या हैदोसाचे वृत्त प्रकाशित करून त्याला पकडण्यासाठी पाठपुरावा केला, हे विशेष.
मेच्या सुरुवातीला अकोटमध्ये एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस सुरू केला तो आजवर सुरूच होता. अचानक हल्ला करून त्याने अनेकांना चावे घेतले. एवढेच काय, तर म्हैस, गायीलाही चावा घेतला होता. त्याच्या चाव्याने न्यायाधीश मोरेही जखमी झाल्यानंतर त्याच्या शोधमोहिमेस प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, दरवेळी पथकाच्या हातावर तुरी देण्यास माकड यशस्वी होत होते.
अकोटमधील सिंधी कॅम्प, राजदे प्लॉट, इंदिरानगर यांसारख्या काही भागांमध्ये त्याचा अधिक हैदोस होता. त्याला पकडण्यासाठी पथकाने नानाविध उपाययोजना केल्या. काठ्या, माकड पकडणारे शिकारी, जाळे, फासे आदींचा वापर केला. मात्र, यश आले नाही. शुक्रवार, १९ जूनपासून त्याने पुन्हा हल्ले सुरू केल्याने आज, २० जूनला शोधमोहिमेस पुन्हा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, दुपारी ४.३० च्या सुमारास सिंधी कॅम्पमधील आर. बी. रामनानी यांच्या निवासस्थानासमोर १०० ते १२५ माकडांची टोळी असल्याचे कळाले. टोळीचे निरीक्षण केले असता पिसाळलेले माकडही तेथे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अकबर खान यांनी त्यांना खायला शेंगदाणे काही खाद्यपदार्थ टाकले.
इतर माकडांनी झाडावरून उतरून खाण्यास सुरुवात केली. मात्र, पिसाळलेले माकड खाली येत नव्हते. कालांतराने त्यानेही खाली येऊन खाद्यपदार्थ खाण्यास सुरुवात केली. हीच संधी हेरत शेख महम्मद उर्फ मुन्ना यांनी बांबूला लावलेल्या ताराच्या फासाने त्याला जेरबंद केले. त्यानंतर मोठ्या मेहनतीने त्याचे हातपाय बांधण्यात आले. माकड पकडल्याचे वृत्त कळताच बच्चे कंपनीसह महिला-पुरुषांनी एकच गर्दी केली होती. अकोटमधील माकड अकोला वन विभाग अकोल्यात आणत असल्याचे एस. डी. देशमुख यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक वायाळ यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेत आरीफ खान, एम. बी. वरठे, एम. एम. मेसरे, इंगळे यांचाही सहभाग होता.
न्यायाधीशांनी पटवली ओळख: पिसाळलेले माकड जेरबंद केल्यानंतर न्यायाधीश मोरेंना दाखवण्यात आले. त्यांना लगेच ओळख पटली. ते म्हणाले की, हे तेच माकड आहे, ज्याने मला चावा घेतला होता. तसेच त्यांच्या पत्नीलाही सदर माकड पकडण्यात यश आल्याचा आनंद झाला.
आर.बी. रामनानी यांच्या निवासस्थानासमोर १०० ते १२५ माकडांची टोळी असल्याचे कळाले. टोळीचे निरीक्षण केले असता पिसाळलेले माकडही तेथे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अकबर खान यांनी त्यांना खायला शेंगदाणे काही खाद्यपदार्थ टाकले. इतर माकडांनी झाडावरून उतरून खाण्यास सुरुवात केली. मात्र, पिसाळलेले माकड खाली येत नव्हते. कालांतराने त्यानेही खाली येऊन खाद्यपदार्थ खाण्यास सुरुवात केली. हीच संधी हेरत शेख महम्मद उर्फ मुन्ना यांनी बांबूला लावलेल्या ताराच्या फासाने त्याला जेरबंद केले. त्यानंतर मोठ्या मेहनतीने त्याचे हातपाय बांधण्यात आले. माकड पकडल्याचे वृत्त कळताच बच्चे कंपनीसह महिला-पुरुषांनी एकच गर्दी केली होती. अकोटमधील माकड अकोला वन विभाग अकोल्यात आणत असल्याचे एस. डी. देशमुख यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक वायाळ यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेत आरीफ खान, एम. बी. वरठे, एम. एम. मेसरे, इंगळे यांचाही सहभाग होता.
न्यायाधीशांनी पटवली ओळख
पिसाळलेले माकड जेरबंद केल्यानंतर न्यायाधीश मोरेंना दाखवण्यात आले. त्यांना लगेच ओळख पटली. ते म्हणाले की, हे तेच माकड आहे, ज्याने मला चावा घेतला होता. तसेच त्यांच्या पत्नीलाही सदर माकड पकडण्यात यश आल्याचा आनंद झाला.
हे ते माकड नाहीच : ...तर काहींच्या मते पकडण्यात आलेले माकड हे पिसाळलेले नसून, चावा घेणारे माकड दुसरेच आहे. कारवाई म्हणून एक माकड पकडले असून, भयभीत करणारे माकड अद्याप खुलेआम फिरत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

माकडाला अनेक जखमा : पकडलेल्या माकडाच्या अंगावर अनेक जखमा दिसून आल्या. त्याच्या पाठीवर, मांडीवर मोठ्या जखमा असून, त्याचा एक हात वाकडा असल्याचे पकडल्यानंतर दिसून आले. बहुधा कुठल्या झटापटीत एक हात दुखापतग्रस्त झाला असावा.
बातम्या आणखी आहेत...