आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनला परतीचे वेध, विदर्भातून काढता पाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - जुलै,ऑगस्टसारखा पाऊस सप्टेंबरमध्ये नसतो. सप्टेंबरमध्ये पावसाचे नऊ पेक्षाही कमी दिवस आहेत. बंगालच्या खाडीत तयार झालेला चक्रवाती हवेचा कमी दाबाचा पट्टा ओडिशा समुद्र तटाला पार करत मध्य प्रदेशाच्या मध्य भागाकडे सरकतो, त्या वेळी विदर्भात पाऊस येतो.
पण, मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा िहमालयाच्या पायथ्यालगत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर असून, त्याचा िवस्तारही कमी झाल्याने हळूहळू विदर्भातून मान्सूनचा पाऊस कमी होत जाईल, असे प्रादेशिक हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

साधारणत: १५ सप्टेंबरपासून पावसाचा उत्तर भारतातून आणि विदर्भातून ऑक्टोबरपासून परतीचा प्रवास सुरू होतो. विदर्भातील परतीचा प्रवास कधी कधी १२ ते १५ ऑक्टोबरपर्यंत वाढतो, असे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. २०१३ मध्ये ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. बंगालच्या उपसागरात सीमांध्रची उत्तर ओडिशाची दक्षिण िकनारपट्टी आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा असल्याने तूर्तास विदर्भात कुठे शाॅवर, तर काही िठकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस येईल. पण, मान्सूनच्या पावसाला आता परतीचे वेध लागले आहे, असे सूत्र म्हणाले.