आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून लवकरच होणार दाखल, 23 मेपासून मान्सून बंगालच्या उपसागरातच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बंगालच्या उपसागरात घुटमळत असलेला मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची चिन्हं असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मान्सूनचा पुढील टप्पा वेळेत गाठण्याची शक्यता आहे, असे असताना मात्र मान्सूनचा प्रवास 23 मे रोजी होता तसाच असून, तो बंगालच्या उपसागरातच आहे.
या वर्षी वेळेच्या दोन दिवस आधीच अंदमान, निकोबार आणि बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाला होता. त्यामुळे मान्सूनचा पुढील प्रवास वेळेत सुरू होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, अनुकूल स्थितीचा अभाव असल्यामुळे बंगालच्या उपसागरातच मान्सून अडकून पडला आहे. 23 मेनंतर त्याची कोणतीही प्रगती झाली नाही तसेच दिल्लीतील हवामान विभागाने मान्सून केरळात उशिरा दाखल होईल, असे जाहीर केले होते. साधारणपणे केरळच्या किनारपट्टीवर 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होत असतो. परंतु, त्यास उशीर होण्याची शक्यता असली, तरी आता पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रवाहाची दिशा फरशी तीव्र नसल्याचे दिसून येत आहे. जूनच्या मध्यावर त्याची तीव्रता वाढून तो पुढे सरकेल. दरम्यान, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात अजूनही पूर्व मोसमी पाऊस हजेरी लावत आहे. दुपारपर्यंत उकाडा आणि त्यानंतर पावसाच्या सरी पडत आहेत. विदर्भातील कही जिल्हय़ांमध्ये गुरुवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.