आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेडन्यूज प्रकरणी खासदार धोत्रेंच्या अडचणींत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - लोकसभा निवडणुकी दरम्यान पेडन्यूज जाहिरातींवर झालेल्या खर्चप्रकरणी खासदार संजय धोत्रे यांची चौकशी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक विभागाला याबाबतचा अहवाल मागितला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संजय धोत्रे विजयी झाले. त्यांच्यावर पेडन्यूज अन्य बाबींवर २६ लाख ९८ हजार रुपये खर्च केला, अशी तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे २०मार्च रोजी केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जून रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. २९ जूनपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश असतानाही अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रशासनाने अहवाल सादर केला नाही. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी १८ जूनला जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते.