अकोला- खांबोराप्रादेशिक पाणीपुरवठा योजना अकोट 84 खेडी योजनेच्या अंमलबजावणीबाबत खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. जीवन प्राधिकरण पैशाच्या मुद्द्यावर ठाम आहेत, तर ग्रामीण पाणीपुरवठ्याचे अधिकारी पैसा नाही म्हणून हातवर करत आहेत. यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
जीवन प्राधिकरण विभाग जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाची संयुक्त बैठक सोमवारी झाली. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सर्व पाणीपुरवठा करणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय २५ मे २०१४ रोजी मुंबई येथे पार पडलेल्या मजीप्राच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या िनर्णयाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदाचा पाणीपुरवठा नोव्हेंबरपासून बंद करण्याचा इशारा जीवन प्राधिकरणने जिल्हा परिषद प्रशासनाला िदला होता. इशाऱ्याने धास्तावलेल्या जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जिल्हा परिषदेच्या पदािधकाऱ्यांनी जीवन प्राधिकरणसोबत संयुक्त बैठक बोलावली. या बैठकीत जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर यांनी १५ नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ िदली होती. मात्र, त्यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पाण्याचा प्रश्न असल्याने खासदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर यांनीही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार सोमवारी नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अकोला कार्यालयात संध्याकाळी बैठक आयोजित केली होती.