आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहितीपट, लघुपटामधील प्रसंग आयुष्य बदलू शकतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पुस्तकातील एखादे वाक्य, नाटकातील एखादा प्रसंग तसेच चित्रपट, लघुपट, माहितीपटातील एखादा क्षण एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो. या माहिती व लघुपट महोत्सवातूनही एखाद्याचे आयुष्य घडू शकेल, असा आशावाद खासदार संजय धोत्रे यांनी येथे व्यक्त केला.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित लघुपट व माहितीपट स्पर्धेतील पारितोषिक विजेते लघुपट व माहितीपट महोत्सवाचे उद्घाटन आज तीन मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात दुपारी तीनला झाले. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, तहसीलदार दिनेश गिते, प्रमोद मुंढे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर स्वरसंगीत अकादमीचे संचालक तथा युवा कलारत्न राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त धनंजय देशमुख व संचाने स्वागतगीत सादर केले. खासदार धोत्रे यांनी महोत्सवाचे रीतसर उद्घाटन झाल्याची घोषणा केली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे म्हणाले, की प्रत्येक कलाकृतीच्या निर्मितीमागे अनेक कलावंतांचे पर्शिम असतात.
या पर्शिमाचे सार्थक रसिकांनी कलाकृतीचा आस्वाद घेतल्यानंतर होते. या वेळी उपस्थितांनी महोत्सवास शुभेच्छा दिल्या. हा उत्सव तीन व चार मार्चला दुपारी तीन ते सायंकाळी सहा असा दोन दिवस सर्वांसाठी खुला राहणार आहे. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले. करमणूक कर अधीक्षक विलास खरात यांनी आभार मानले. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबईच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचा अकोलेकर रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. देवराई या माहितीपटाने महोत्सवाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमासाठी अजय तेलगोटे, विलास खरात, प्रवेश देवकते, गोपाल शर्मा, नेहा शुक्ला, मोहिनी चिपळे, मोहन साठे आदींनी पुढाकार घेतला.