आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या मायेमुळेच बनू शकले जबाबदार प्रशासकीय अधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - लहान मुलगी असताना तिला झोपाळ्यात ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अभ्यास केला व परीक्षाही दिली. त्यात यशस्वी होऊन एक जबाबदार अधिकारी बनली. मात्र, हे सर्व मुलांच्या मायेमुळेच शक्य झाल्याचे मत जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी मातृदिनानिमित्त व्यक्त केले.
मुलांना जोपासण्याचे कार्य असो वा संगोपनाचा विषय, आपली मुले ही आपल्याच छायेखाली वावरली पािहजेत. नविासी शाळांमध्ये ठेवून मुलांना कौटुंबिक आधार मिळत नाही. घरीच मुलांवर संस्कार केले जाऊ शकतात. सर्वांगीण दृष्टी मुलांना दिल्या जाते. मानसिक आधार मिळतो. मुलांकडे लक्ष देणे सोयीचे होते. एकत्रित कुटुंबात आजी-आजोबांकडून मुलांना धडे मिळतात. संस्कािरत मूल्य जपल्या जातात. मुलांनी काय करावे, हे त्यांचे भविष्य त्यांच्याच हातात देणे सोयीचे आहे. मुलांनी सर्वांचा आदर बाळगावा. अशा अनेक आशा पालकांच्या असतात. परंतु, खऱ्या अर्थाने मुलांनीच मला मानसिक आधार दिला आहे. परीक्षा देताना जीव कासाविस व्हायचा. मुलीची चिता असायची. मात्र, पाळण्यात टाकलेल्या मुलीने घरी आल्यावर पाहून हसायचे. या मातृत्वाच्या संकल्पनाच गडद असतात. त्याला शब्दांचा भावनिक आधार देता येत नाही. मला कळलेच नाही, मी मुलांची माता आहे की, माझी मुलेच माझी माउली झाले. त्यामुळे मातृत्वाची ओढ ठेवत ओढाताणीतून सुटीचा दविस मुलांसोबत घालवते. मुलगा पृथ्वीराज व मुलगी नक्षत्रा अशी दाेन मुले आहेत. त्यामुळे मातृत्वाला हवे असलेले सर्वकाही आपल्याकडे आहे. मुलासोबतच मुलीलाही सर्वांगीण आधार देण्यासाठी धडपड सुरू आहे. शांत मुलांनी अधिकारी बनवले आहे.