आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच एजंसीला कंत्राट; महावितरणचा घाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सुशिक्षित बेरोजगार संस्था किंवा बचत गटांना फोटो मीटर वाचन, पंचिंग बिल वाटपचे कंत्राट देणे आवश्यक होते. मात्र, महावितरण अधीक्षक अभियंत्यांनी एकाच संस्थेला ई-निविदेद्वारे कंत्राट दिला. याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख गणेश चौकसे यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले की, सुशिक्षित बेरोजगार संस्था किंवा बचत गटांना फोटो मीटर वाचन, पंचिंग बिल वाटपचे कंत्राट एक लाखाच्या ऑर्डरप्रमाणे कोटेशन तत्त्वावर सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय संस्थांना, इलेक्ट्रिकल एजंसीला महिला बचत गटांना हे काम दिले आहे. पण, सध्या टेंडरिंगच्या माध्यमातून या सगळ्यांना डावलून एका विशिष्ट एजंसीला संपूर्ण जिल्ह्याचे काम कसे मिळेल यासाठी महावितरण कंपनीमध्ये आठ दिवसांपूर्वी रुजू झालेले अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. निविदेमध्ये २४ हजार ग्राहकांचे फोटो वाचन करण्याबाबत एक वर्षाचा अनुभव सिंगल ऑर्डरप्रमाणे असणे आवश्यक असल्याचे निविदेमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र, ज्या एजंसीकडे अशा प्रकारचा अनुभव नसतानाही निविदा प्रक्रियेमध्ये त्यांना पात्र करण्यात आले. मात्र, ज्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांना डावलण्यात आले आहे. तर, निविदा प्रक्रियेमध्ये अपात्र झालेल्या एजंसीला कोणत्याही प्रकारची माहिती सदर अधिकार्‍यांनी देणे आवश्यक असताना ती दिली नाही.

एकीकडे सुशिक्षित बेरोजगार संस्थांना पाच लाखांपर्यंतची कामे विनानिविदा देण्यात यावी, असा शासनाचा अध्यादेश आहे. मात्र, तो अध्यादेश डावलून टेंडरिंगच्या नावाखाली एकाच एजंसीला संपूर्ण जिल्ह्याचे काम मिळावे, यासाठी अधीक्षक अभियंता यांचे प्रयत्न आहे. एक किंवा दोन लाखांची पीसी वाईज कोटेशन पद्धतीने ऑर्डर काढून स्थानिक सुशिक्षित बेरोजगार संस्थांना महिला बचत गटांना जास्तीत जास्त काम देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली आहे. अन्यथा बेरोजगारांसाठी महिला बचत गटांसाठी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल याची जबाबदारी महावितरणचे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता यांच्यावर राहील. मीटर रीडिंग बिल वाटप कामाची ई-टेंडरिंगची प्रक्रिया अकोलामध्ये संभाजी ब्रिगेड होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

(पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन देताना पदाधिकारी, कार्यकर्ते.)