आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाह्यस्रोत’ कर्मचारी करणार ‘कायम’चा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मागील काही वर्षांपासून महावितरण कंपनीत विविध पदांवर कार्यरत असलेल्या आउटसोर्सिंग (बाह्यस्रोत) करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. नियमित कर्मचार्‍यांप्रमाणे अनेक वर्षांपासून काम करणार्‍या या कर्मचार्‍यांना कायम करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केली आह़े

राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण कंपनीत कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ यंत्र चालक, कॉम्प्युटर ऑपरेटर, लिपिक, शिपाई या पदांवर राज्यात सुमारे 10 हजारांहून अधिक कर्मचारी आउटसोस्र्ड करण्यात आले आहेत. अमरावती परिमंडळात 250 कर्मचारी आउटसोर्सिंगवर कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांना आउटसोर्स करण्यात आले असले, तरी ते नियमित कर्मचार्‍यांप्रमाणे काम करत आहेत. असे असतानाही त्यांना पाच ते सात हजार रुपये वेतन देण्यात येत आहे. त्यांना महागाई भत्ता व सवलती देण्यात येत नाहीत. मात्र, त्यांना कायम कामगारांहून अधिक काम करावे लागत आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन काही वर्षांपासून या कर्मचार्‍यांच्या हक्कांसाठी लढा देत आहे. हे कर्मचारी अनेक वर्षांपासून काम करत असल्यामुळे त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांना महावितरण कंपनीत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार घेण्यात यावे, अशी मागणी व्यवस्थापनाकडे करण्यात आली. मात्र, त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी व्यवस्थापनाने कोणतीही यंत्रणा उपलब्ध करून दिली नाही, असा आरोप फेडरेशनने केला आहे. अनेकदा नोकरभरती करताना महावितरणद्वारे अनुभव नसलेल्या उमेदवारांना कायम नोकरी देण्यात येत़े मात्र, अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या या कर्मचार्‍यांचा विचार करण्यात येत नाही. कंपनीच्या केवळ काही जाचक अटींमुळे या कर्मचार्‍यांवर अन्याय होत असल्याचे फेडरेशनने म्हटले आह़े

पाठपुरावा करणार
आऊटसोर्सिंगच्या कर्मचार्‍यांना नियमित करण्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. नियमित कर्मचार्‍यांप्रमाणेच आऊटसोर्सिंगचे कर्मचारी कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांना नियमित करण्याची मागणी फेडरेशनद्वारे लावून धरणार. राजेश कठाळे, सचिव, अमरावती परिमंडळ