आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलक हिंसक झाले तर कार्यालयच बंद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना आंदोलनाच्या नावाखाली धमकावणे, शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यातून कर्मचार्‍यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महावितरणने कर्मचार्‍यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा वेळी कार्यालय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बेजबाबदार आंदोलनामुळे महावितरणचे कार्यालय बंद राहून त्याचा विकासावर विपरित परिणाम होऊ शकतो.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना अत्यावश्यक वीज सेवा पुरवली जाते. मात्र, ही सेवा देणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांना मागील काही दिवसांमध्ये आंदोलनाच्या नावाखाली शिवीगाळ, दबाव, मारहाण, मालमत्तेची हानी व जीवावर बेतणारे हल्ले केले जात असल्याची बाब समोर आली आहे. असे अशोभनीय व मानसिक खच्चीकरण करणार्‍या प्रकारामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खचले आहे. बेजबाबदार आंदोलनामुळे कर्मचार्‍यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊन त्याचा सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. या सर्व प्रकाराची गंभीर दखल महावितरण प्रशासनाने घेतली आहे. ज्या भागात सेवा करणे कठीण असून, असुरक्षितपणाची शक्यता वाटत आहे, अशा भागातील कर्मचार्‍यांनी तेथील कार्यालय कुलूप बंद करून तत्काळ तेथून निघून जाण्याचे आदेश महावितरणच्या मुख्य कार्यालयातून अधिकारी व कर्मचार्‍यांना देण्यात आल्याची माहिती आहे. या बंद काळातसुद्धा कर्मचार्‍यांना वेतन देण्यात येणार आहे. ग्राहकांना वीज सेवा देत असताना काही वेळा जीव धोक्यात घालून कर्मचार्‍यांना कामे करावी लागतात. सुरक्षेची हमी दिल्याशिवाय कार्यालय पूर्ववत सुरू न करण्याचा निर्णयसुद्धा महावितरण प्रशासनाने घेतला आहे. बेजबाबदार आंदोलनामुळे महावितरणचे कार्यालय बंद होऊन वीजपुरवठा प्रभावित झाल्यास त्या भागातील विकासकामांवर त्याचा परिणाम होणार आहे. केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलन करणार्‍यांमुळे वीजपुरवठा विस्कळीत झाल्यास त्या परिसरातील सर्व नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

राजकीय र्शेय लाटण्यावर लगाम?
केवळ राजकीय र्शेय लाटण्यासाठी वारंवार बेजबाबदार आंदोलन होत असल्यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांवर भीतीचे वातावरण आहे. महावितरणच्या कर्मचार्‍यांमध्ये असंतोष खदखदत आहे. हा प्रकार आता महावितरणने गंभीरतेने घेतला असून, अशा घटना घडणार्‍या ठिकाणी कर्मचार्‍यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. परिणामी, विकासकामे थांबवून वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय र्शेय लाटण्याच्या प्रकारावर लगाम बसण्याची शक्यता आहे.