आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी व्हावी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटन सचिव रामेश्वर पवळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

येथील जिल्हा परिषद विर्शामगृहामध्ये शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंडे यांच्या अपघाताच्या घटनाक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपण सविस्तर निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले असून, त्याच्या प्रतिलिपी केंद्र आणि राज्यातील नेत्यांना पाठवण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रामेश्वर पवळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.