आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सुविधांसाठी २० कोटी देऊ- मुनगंटीवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला,वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांच्या सोयीसाठी सुसज्ज सामान्य रुग्णालयासाठी २० कोटी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आमदार गोवर्धन शर्मा यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.

आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी येत्या आठ दिवसांत आरोग्य विभागाने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुनगंटीवार यांनी दिले. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय समिती अहवाल देईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
अकोल्यात सांस्कृतिक भवन व्हावे ही जुनी मागणी असून, त्यासाठी १० कोटी रुपये देण्याचे अर्थमंत्र्यांनी मान्य केले. अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे, त्यामुळे वैद्यकीय सुविधेत भर पडली आहे. परंतु, सर्वोपचार रुग्णालय अधिक सुसज्ज व्हावे, आवश्यक त्या बाबींची पूर्तता व्हावी या उद्देशाने निधीची कमतरता भासत असल्याचे आमदार शर्मा यांनी सांगितले. विदर्भ चेंबरला विभागीय कार्यालय कक्ष अकोल्यात हवा आहे. ही मागणीही पूर्ण व्हावी याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले.

विभागीय आयुक्तांशी बोलून मार्ग काढता येईल, असे आश्वासन मुनगंटीवारांनी दिले. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय अग्रवाल, नगरसेवक प्रतुल हातवळणे उपस्थित होते.