आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration, Latest News In Divya Marathi

लॉजिंग-बोर्डिंगचा संप मागे, आयुक्तांची भूमिका ठरली निर्णायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- इमारतवापर परवाना नसल्यामुळे लावलेल्या शास्तीचा भरणा टप्प्याटप्प्याने करा, या आवाहनाला लॉजिंग-बोर्डिंग व्यावसायिकांनी आवाहन देत,13 ऑक्टोबरला संप मागे घेतला. हा तिढा सुटल्यानंतर आता खासगी हॉस्पिटलला शास्ती दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
इमारत वापर परवाना नसताना लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवसाय करता येत नाही. नियमानुसार इमारत वापर परवाना नसेल, तर दुप्पट शास्ती लावण्याचा अधिकार महापालिकेला आहे. महापालिकेने दुप्पट शास्ती लावल्याने लॉजिंग-बोर्डिंग व्यावसायिकांनी संप पुकारला होता. शास्तीची रक्कम एकाच वेळी भरावी लागणार, अशी चुकीची समजूत व्यावसायिकांमध्ये झाली होती. मात्र, आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शास्तीचा भरणा टप्प्याटप्प्यात केल्यास हरकत नाही. व्यावसायिकांनी चार टप्प्यात हा भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. आयुक्तांनी केलेल्या या आवाहनाला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे 13 ऑक्टोबरपासून हा संप मागे घेण्यात आला आहे. डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केवळ नियमाचा आधार घेत महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. व्यावसायिक संप मागे घेऊन टप्प्याटप्प्याने शास्तीचा भरणा करणार असल्याने मनपाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. तर खासगी हॉस्पिटलवर शास्ती आकारली जाणार आहे. काही खासगी हॉस्पिटलला शास्ती बजावल्या आहेत. खासगी हॉस्पिटलनेही शास्तीचा भरणा केल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघू शकतो.