आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest News In Divya Marathi

जकात नाक्यासह पोलिस चौकीवर चालला ‘गजराज’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रेल्वेस्थानक चौकातील मनपाच्या जकात नाक्यासह पोलिस चौकी इमारत, पार्किंग स्थळाचे बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण हटाव पथकाने 28 जुलै रोजी केली. रेल्वेस्थानक चौक परिसराचे सौंदर्यीकरण प्रकल्प प्रस्तावित असून, या प्रशस्त रस्ता व सौंदर्यीकरणासाठी स्वत:च्या जकात नाका कार्यालयाचे बांधकाम पाडून परिसर सौंदर्यीकरणासाठी मोकळे करण्यात आले. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात शहरातील मुख्य चौक, मोक्याचे ठिकाणी विकास आराखड्यानुसार सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. प्रस्तावित ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याचे कार्य गत काही दिवसांपासून मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने सुरू आहे. जकात नाका इमारतही या कारवाईतून सुटली नाही. ही कार्यवाही सहायक आयुक्त राजेंद्र घनबहादूर, कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर, अतिक्रमण अधिकारी विष्णू डोंगरे, प्रवीण मिर्शा, संजय थोरात, र्शी. बडोणे, विनोद वानखडे आदींनी केली.