आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest News In Divya Marathi

अकोल्यात लवकरच नवीन बस वाहतूक सेवा; पिंप्री-चिंचवड येथील कंपनी देणार सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिका क्षेत्रात पिंप्री चिंचवड येथील ट्रॅव्हल्स कंपनीच्या वतीने लवकरच शहर बस वाहतूक सेवा सुरू होत आहे. या अनुषंगाने प्रशासनाची संबंधित कंपनीशी बोलणी सुरू आहे. राज्यात आदर्श ठरलेली सहकारी तत्त्वावरील बससेवा चार ऑगस्टपासून बंद होत आहे.
महापालिका अस्तित्वात आल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी स्वस्त दरात महापालिका क्षेत्रात कोणत्याही ठिकाणी जाणे-येणे करण्यासाठी सहकारी तत्त्वावर 2003 ला बससेवा सुरू करण्यात आली. प्रारंभी दहा बसेसने ही सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर 13 नवीन बस खरेदी करण्यात आल्या. 2007 पर्यंत सुरळीत सुरू असलेली ही सेवा नंतर डबघाईस आली. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पावले न उचलल्याने अखेर एकतर पाच कोटी रुपये अनुदान द्या अन्यथा बससेवा बंद करू, असा इशारा अकोला शहर बस वाहतूक संस्थेच्या प्रशासकांनी दिला.
महापालिकेला कोणत्याही परिस्थितीत बससेवेला पाच कोटी रुपये देणे शक्य नसल्याने ही बससेवा चार ऑगस्टला बंद केली जाणार आहे. कंपनीशी पहिल्या टप्प्यात झालेल्या चर्चेनुसार कंपनी सात बस उपलब्ध करून देईन, बसचे चालक कंपनीचे राहणार असून, इंधन तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च कंपनी करणार आहे, तर वाहक महापालिका नियुक्त करेन. कंपनीने प्रती किलोमीटरनुसार पैशाची मागणी केली आहे.
अद्याप याबाबत निश्चित निर्णय झालेला नाही, परंतु येत्या काही दिवसात या नवीन बससेवेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तरी दुसरी बससेवा नागरिकांना लवकरच उपलब्ध होणार आहे.