आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामनगरात अपार्टमेंटच्या आउटलेटचे पाणी रस्त्यावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रामनगरस्थितकल्पना रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या आउटलेटमधील सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे अपार्टमेंटसमोरच घाण पाणी जमा झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील नगरसेविकेने तात्पुरती उपाययोजना म्हणून नालीतील पाणी बाजूच्या खुल्या प्लॉटमध्ये वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे पाणी रत्यावर आल्याने इतर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मनपाच्या वतीने परिसरात सार्वजनिक मूलभूत सुविधा पुरवण्यात येत नसल्याचे नागरिकांचे मत आहे. आउटलेटचे निर्माणकार्य करण्यात आले नसल्याने सर्व्हिस लाइनमध्ये सांडपाणी साचून राहते. अपार्टमेंट निर्माणकार्याच्या वेळी संबंधित बिल्डरने येथे आउटलेट बांधले नाही, तर बाजूलाच असलेल्या इमारतीच्या बांधकामात इमारतीचे आउटलेट हे उंचावर बांधण्यात आले. यासंदर्भात मनपाला अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, येथील नागरिकांच्या समस्यांचे निवारण झाले नाही. गत दोन दिवसांपूर्वी पावसामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यासंदर्भात कल्पना अपार्टमेंटमधील रहिवासी नागरिकांनी येथील नगरसेविका प्रतिभा अवचार यांना समस्या सोडवण्याची मागणी केली होती. नगरसेविका यांनी जेसीबीच्या साहाय्याने येथे साचलेले सांडपाणी जवळच असलेल्या खुल्या प्लॉटमध्ये वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे पाणी मुख्य रत्यावर येऊन साचल्याने परिसरात चांगलाच वादंग निर्माण झाला होता. रस्त्यावर साचलेले घाण पाणी काढण्याची मागणी गर्ल्स हॉस्टेलमधील मुलींनी कृष्णा अपार्टमेंटमधील नागरिकांनी केली आहे.
निधीअभावी आउटलेटचे बांधकाम रखडले
रामनगरयेथील कल्पना रेसिडेंसी अपार्टमेंटच्या आउटलेटचे पाणी एकाच जागी साचून आहे. तसेच दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कल्पना रेसिडेंसी अपार्टमेंटच्यासमोर हे साचलेले पाणी तात्पुरते रिकाम्या प्लॉटमध्ये वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर निधीअभावी आउटलेटचे बांधकाम रखडलेले आहे.'' प्रतिभाअवचार, नगरसेविका
रामनगरस्थित कल्पना रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या आउटलेटमधील सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे अपार्टमेंटसमोरच घाण पाणी जमा झाले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
निवेदने दिलीत मात्र अद्यापही कारवाई नाही

आउटलेटचे निर्माणकार्य करण्यात आले नसल्याने सर्व्हिस लाइनमध्ये सांडपाणी साचून राहते. रामनगर परिसरात अनेक सुविधांचा अभाव आहे. येथील कल्पना रेसिडेन्सी अपार्टमेंट परिसरातील समस्येचे निराकरण करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदने देण्यात आले आहेत. परंतु, यावर अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.'' अजयशर्मा, नगरसेवक