आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पारसकर यांच्या शोरूमसह अनेकांच्या अवैध नळजोडण्या मनपाने तोडल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अवैधनळजोडणी शोधमोहिमेत पाणीपुरवठा विभागाने दोन दिवसांत पारसकर हुंडाई शोरूमसह शहरातील ६८ अवैध नळजोडण्या तोडल्या. दंडाचा भरणा केल्याने यापैकी दहा नळजोडण्या पुन्हा जोडण्यात आल्या, तर या मोहिमेतून महापालिकेला ७५ हजार रुपयांचा महसूलही प्राप्त झाला आहे. ही मोहीम आणखी काही दिवस चालवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.
शहराला ग्रीन-क्लीनसोबतच डिसीप्लिन लावण्याच्या हेतूने आणि महापालिकेची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने अवैध नळजोडणी शोधमोहीम सुरू केली आहे. 18 सप्टेंबरपासून अवैध नळजोडणी शोधमोहीम सुरू केली आहे. 27 सप्टेंबरला राबवलेल्या अवैध नळजोडणी मोहिमेत माधवनगरातील महाराजा विहारमधील उत्तमसिंग सावते, दिनेश सावते, प्रीतमसिंग सावते, दिलीप देशमुख, शैलेश खटोड, डॉ. सौ. जैन, मोहन जैन, वसुंधरा मोहरीर, मोहन जैन, सुनील इंगोले, एम. एस. कळसकर, उषा जगड, एम. के. शर्मा, श्री. गायकवाड, नगिनकुमार धामेचा, समीर निर्मल, प्रेमसिंग जाधव, दीपक सुरोशे, निर्मल दासानी, रामराव देशमुख, डॉ. आयलानी, प्रल्हाद भगत, अनिल वानखडे, सुधीर सरोदे, ओमप्रकाश कचोलीया, सरोज पाटील, भास्कर हातेकर, उत्तम जायभाये, चंद्रशेखर इंगळे, उमेश पवार, अनिल पुरोहित, पुष्पक खंडेलवाल, सुकेश खटोड, मेहुल मावानी, तर 28 सप्टेंबरला बिर्ला रेल्वे गेट परिसरातील दोन अपार्टमेंटमधील एकूण 23 नळजोडण्या तोडण्यात आल्या. यापैकी एका अपार्टमेंटमधील नागरिकांनी दंडाच्या रकमेचा त्वरित भरणा केल्याने दहा नळजोडण्या पथकाने पुन्हा जोडून दिल्या. डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशान्वये उपअभियंता नंदलाल मेश्राम, संदीप चिमणकर, शैलेश चोपडे, धीरज ठाकूर, संतोष पाचपोर, रमेश थुकेकर, संजय डोंगरे, संजय पाटील, शेख फिरोज शेख गफूर यांनी राबवली. दम्यान, अवैध नळजोडणी पथकाने या दोन दिवसांच्या मोहिमेत 75 हजारांचा महसूल प्राप्त केला.
शहर पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात झाला बदल

मनपा प्रशासनाने दोन अवैध नळजोडण्या तोडल्या:
जठारपेठचौकालगत असलेल्या पारसकर हुंडाई शोरूममध्येही अवैध नळजोडणी पथकाला दोन अवैध नळजोडण्या आढळून आल्या. पथकाने या दोन्ही नळजोडण्या तोडल्या. शहरातील प्रसिद्ध प्रतिष्ठांनामध्येही अवैध नळजोडण्या आढळून येत असल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे .