आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration,latest News In Divya Marathi

चार दुकाने अतिक्रमण पथकाने केली उद्ध्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकाअतिक्रमण हटाव पथकाने एक ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाच्या दरवाजालगत असलेली दोन तर गांधी मार्गावरील दोन अशी चार दुकाने उद्ध्वस्त केली. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजय अग्रवाल तसेच गिरीश जोशी यांनी या कारवाईला राजकीय रंग असल्याचा आरोप केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाला दोन पश्चिम बाजूस, एक दक्षिण बाजूस प्रवेशद्वार आहे. यापैकी पश्चिम बाजूकडील मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त दुसऱ्या प्रवेशद्वाराचा उपयोग फारसा होत नाही. या प्रवेशद्वारालगतची जागा तुलसी बुक डेपो आणि शीतल कलेक्शन या दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना देण्यात आली होती. ही दोन्ही दुकाने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली. त्याचबरोबर खुले नाट्यगृहाच्या दक्षिण बाजूस असलेली रसवंती तसेच शासकीय दूध डेअरीचे दुकानही जमीनदोस्त करण्यात आले. एेन दसऱ्याच्या तोंडावर ही दुकाने उद्ध्वस्त झाल्याने व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना देता ही मोहीम राबवल्याने एकच खळबळ उडाली होती. ही कारवाई राजकीय स्वरूपाची असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. परंतु, ही कारवाई प्रवेशद्वार मोकळे करण्यासाठी करण्यात आल्याची बाब महापालिका प्रशासनाने स्पष्ट केली.
सिव्हिललाइन चौकातील रस्त्यालगत पडलेले बांधकाम साहित्य केले जप्त
दरम्यान,अतिक्रमण हटाव पथकाने सायंकाळी पाचच्या सुमारास सिव्हिल लाइन चौकातील रस्त्यालगत पडलेले बांधकाम साहित्य जप्त केले. या बांधकाम साहित्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची बाब पथकाने स्पष्ट केली. रस्त्यावर बेवारसपणे साहित्य पडलेले असल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.

बेरोजगार करण्याचे धंदे बंद करा
मनपाप्रशासन दादागिरी करत आहे. आचारसंहितेच्या नावाखाली पूर्वसूचना देता, संबंधितांची कागदपत्रे पाहता दुकाने थेट जमीनदोस्त करणे ही चुकीची पद्धत आहे. बेरोजगारांसाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. प्रशासनातील अधिकारी केवळ रोजगारांना बेरोजगार करण्याचेच प्रकार करत आहेत. विकासाच्या नावाने मात्र बोंबाबोंब आहे. प्रशासनाची कोणत्याही प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. तसेच कोणत्याही बेरोजगारावर अन्याय होऊ देणार नाही.'' विजयअग्रवाल, नगरसेवकभाजप
कारवाई राजकीय हेतूने प्रेरित
महानगरपालिका प्रशासनाची अतिक्रमण काढण्याची कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित आहे. रामदेवबाबा प्रकरणाचा बदला महापालिका प्रशासनाने ही मोहीम राबवून काढला. जागेचे कागदपत्र उपलब्ध असताना तसेच चिवचिव बाजार उठवताना संबंधिताला ही जागा पैसे भरून देण्यात आली. मात्र, कागदपत्रे पाहताच, तसेच संबंधितांचे कोणतेही म्हणने ऐकून घेता महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली. त्यामुळे ही कारवाई राजकीय हेतूने केली आहे.'' गिरीशजोशी, प्रसिद्धिप्रमुख,भाजप