आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Executive Engineer Get Ultimatam

अकोल्यात नियमित पाणीपुरवठय़ासाठी काँग्रेस नेते झाले आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान धरणामध्ये 81 टक्के जलसाठा आहे. तरीही, पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने 24 जुलैला प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत शहर काँग्रेसतर्फे महापालिका जलप्रदाय विभागाच्या अभियंत्यांना 15 ऑगस्टपर्यंत नियमित पाणीपुरवठा न झाल्यास आयुक्तांच्या कक्षात ठिया आंदोलन करणार असल्याचा इशारा गुरुवारी देण्यात आला आहे.

महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकल्यानंतर शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल, असे अभिवचन अँड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले होते. मात्र,अजूनही शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. यासाठी काँग्रेसने महापालिकेत धाव घेत जलप्रदाय विभागाचे शहर अभियंता अजय गुजर यांच्याशी चर्चा करण्यात आली.

निधी नसल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे गुजर यांनी सांगितले. निवेदन देताना काँग्रेस पक्षाचे मनीष हिवराळे, कपिल रावदेव, अनंत बगाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.