आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Issue At Akola, Divya Marathi

प्रशासन-नगरसेवकांमध्ये झाली अंतर्गत धुसफूस सुरू , विविध कारणांवरून वाद होण्‍याची चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकाप्रशासन आणि नगरसेवकांमध्ये काही दिवस सुखाचे गेल्यानंतर आता सरते शेवटी विविध कारणांवरून धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा प्रशासन आणि नगरसेवक, असा वाद होणयाची चर्चा सुरू आहे.
महापालिका प्रशासन आणि नगरसेवक यांचे महापालिका अस्तित्वात आल्यापासून एखादा अपवाद वगळता आयुक्तांशी फारसे पटलेले नाही. त्यामुळेच १४ वर्षांच्या कार्यकाळात दोन आयुक्तांवर अविश्वास आणला गेला, तर एका आयुक्तांनी अविश्वासाच्या हालचाली सुरू झाल्याबरोबर बदली करून घेतली. महापालिकेच्या १४ वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत एक आयएएस एक प्रमोटी आएएस अधिकारी आले. प्रत्येक आयुक्तांशी नगरसेवकांचे वाद झाले. मु. ग. घाटे यांचा कार्यकाळ केवळ सहा महनि्यांचा राहिल्याने तर दीपक चौधरी राजन भवरे यांनीही फारशी कामेच केल्याने तसेच महापािलकेतील राजकारण ओळखून कामकाज केल्याने वाद झाला नाही. मात्र, लक्ष्मीकांत देशमुख, संजय काकडे, चंद्रशेखर रोकडे, डॉ.विपीन शर्मा, गिरधर कुर्वे या आयुक्तांसोबत नगरसेवकांचे वाद झाले. विद्यमान आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याशी नगरसेवकांचे सूत जुळेल, असे आशादायी चित्रत्र पाहावयास मिळत होते. परंतु, काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेपासून नगरसेवक प्रशासन यांच्यातील वादाला तोंड फुटले. १८ जुलैला झालेल्या महासभेत आयुक्तांनी सभेपूर्वी सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन सर्वानुमते प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुळे एकाच सभेत कोणताही वाद होता, ३१ विषयांना मंजुरी मिळाली. मात्र, मंजूर झालेल्या विषयांमधील २६ कोटी रुपयांच्या विकास निधीचा विषय या वादाचे मुख्य कारण ठरत असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.
टाळी एका हाताने वाजत नाही, प्रशासनाला सहकार्य केल्यानंतर प्रशासनानेही पदाधिकारी, नगरसेवकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. परंतु, प्रशासन नगरसेवक-पदाधिकाऱ्यांकडून केवळ सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करत असून, पदधिकाऱ्यांच्या कामाला तसेच सन्मानाला दुय्यम दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी नाव छापण्याच्या अटीवर केला आहे. त्यामुळे २१ ऑगस्टला झालेल्या महासभेत काही महत्त्वपूर्ण विषय पेंडिंग ठेवण्यात आले. यामुळे प्रशासनानेही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाआघाडीच्या सत्ताकाळाच्या अखेरच्या दिसवसात प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.