आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Or Human Being Nuture Center

मनपा की मनुष्य पालन केंद्र; विराेधकांचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिमहासभेला उपस्थित महापालिकेचे सदस्य. - Divya Marathi
प्रतिमहासभेला उपस्थित महापालिकेचे सदस्य.
अकोला - सत्ताधारीगटातील अंतर्गत धुसफुशीमुळे विकासकामे रखडली आहेत. स्थगित सभा घेण्याची वारंवार मागणी करूनही सभा घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधारी गटाच्या निषेधार्थ तसेच सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी विरोधी गटाने १६ जूनला महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेेडकर सभागृहात प्रतिमहासभा घेतली. या सभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरले तर विरोधकांवर टीका करून ही महापालिका आहे की मनुष्य पालन केंद्र, असा प्रश्न उपस्थित केला.

२७ मे रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह मोर्णा प्रकल्प ते महान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकणे तसेच शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. परंतु, ही सभा सत्ताधारी गटाच्या अंतर्गत कलहांमुळे स्थगित करावी लागली. सत्ताधारी गटातील मनभेद अद्यापही संपुष्टात आल्याने ही स्थगित सभा बोलावण्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. सभा घेतल्याने विविध विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे निधी असतानाही शहराचा विकास थांबला आहे. या अनुषंगाने विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी महापौर तसेच आयुक्तांना निवेदन देऊन सभा बोलावण्याची तसेच नगरसेवकांच्या प्रभागातील समस्या मार्गी लावण्याचे आवाहन केले होते.

यासाठी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. परंतु, त्यानंतरही सभा बोलावली गेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी आयुक्तांना अंतिम इशारा देत १६ जूनला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसोबत बैठक घेतल्यास, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवल्यास आयुक्तांच्या गाडीला काळे फासण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यामुळे आयुक्तांनी ही बैठक घेतली.

बैठकीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील स्वच्छता, पाणी, पथदिवे तसेच रखडलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत प्रशासनाला जाब विचारला. गेल्या काही महिन्यांपासून मूलभूत सोयीसुविधांचीही कामे होत नसल्याचा आरोप आयुक्तांवर करून प्रेमाने काम करा अन्यथा खुर्ची खाली करा, असा थेट इशाराच विरोधी पक्षनेते साजिदखान यांनी दिला. तर, रफिक सिद्दीकी यांनी शाळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी राहिलेला असताना प्रशासनाकडून शाळा दुरुस्तीबाबत कोणतीही कारवाई सुरू झाली नसल्याबद्दल चांगलेच धारेवर धरले. या वेळी मदन भरगड, अजीज अहमद, दिलीप देशमुख, राजू मुलचंदानी, अॅड. धनश्री देव, अरुंधती शिरसाट आदी नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील समस्या मांडल्या. दरम्यान, या विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दिले.

यापुढे कराचा भरणा नाही
माझ्याप्रभागातील नागरिक यापुढे कोणत्याही प्रकारच्या कराचा भरणा महापालिकेत करणार नाही. या कराचा भरणा बँकेत केला जाईल गोळा झालेल्या कराच्या पैशातून प्रभागातील मूलभूत सोयीसुविधांची कामे केली जातील. मदन भरगड- माजी महापौर.

उपायुक्त मडावी यांचे कौतुक
सभेतउपायुक्त माधुरी मडावी यांनी सुरू केलेल्या रिअसेसमेंट मोहिमेबाबत अनेक नगरसेवकांनी कौतुक केले. तर, दंडात्मक कारवाई करता, परंतु पाणी देता का, असा प्रश्न मदन भरगड यांनी उपस्थित केला. यावर इतर नगरसेवक मडावी यांच्या पाठीशी उभे राहिले. यासाेबतच सभेत विविध विषयांवर चर्चा झाली.

कल्याणकर असताना बोललो का?
प्रतिसभेतआयुक्तांवर थेट टक्केवारीचे आरोप लावण्यात आले. टक्केवारीशिवाय आयुक्तांना दुसरे काहीच दिसत नाही, असा थेट आरोप अरुंधती शिरसाट यांनी केला. यावर मदन भरगड यांनी नगरसेवकांनी थोडे बोलण्याचे भान ठेवा, यापूर्वी कल्याणकर असताना आपण संयम सोडून बोललो का? असा प्रश्न उपस्थित केला. परंतु, यामुळे विरोधी गटाचे नगरसेवक चांगलेच भडकले.

उपायुक्त गुल्हानेंवर आगपाखड
उपायुक्तचंद्रशेखर गुल्हाने यांच्यावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी चांगलेच तोंडसुख घेतले. गुल्हाने महापालिकेत कधीही दिसत नाहीत. त्यांच्याकडून प्रशासन काम का करून घेत नाही, असा सवालही नगरसेवकांनी उपस्थित करून सत्ताधारी गटालाही याबाबत चांगलेच धारेवर धरले.

अधिकाऱ्यांची चापलुसी करू नका
सभेतकाही नगरसेवकांनी आयुक्तांची बाजू उचलून धरली. त्यावर साजिदखान पठाण भडकले. ही सभा महापौरांची नाही, ही सभा विरोधकांची आहे. आम्हाला कामे हवी आहेत. त्यामुळे जे नगरसेवक अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची बाजू घेतील, त्यांनी कृपया सभागृह सोडावे, अशी विनंती वजा सूचना केली.

विरोधक आक्रमक
छत्रपतीशिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे काय झाले, असा प्रश्न साजिदखान, दिलीप देशमुख यांनी उपस्थित केला. तर, मदन भरगड यांनी तीन कोटी रुपयांची देयके मनपा फंडातून काढली जातात, मग प्रवेशद्वाराचे काम का केले जात नाही, याचा जाब प्रशासनाला विचारला. याचबरोबर पालखी मार्गाची दुरुस्ती आणि मशीद परिसरातील कामे झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला.

नाव कोणाचेही द्या
प्रवेशद्वारासाठीआमदार शर्मा निधी देणार आहेत, असा खुलासा केल्यानंतर नगरसेवकांनी त्यांच्या नावाची पाटी लावण्यासाठी निधी देत आहेत का, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. त्यावर साजिदखान म्हणाले, प्रवेशद्वाराखाली नाव कोणाचेही द्या, परंतु आमच्या छत्रपती प्रवेशद्वाराचे काम सुरू करा.