आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेने पाडले स्वत:चेच बांधकाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अतिउत्साहात कशा चुका होतात, याचा प्रत्यय अकोलेकरांना मे रोजी आला. अशोक वाटिका चौक परिसरालगत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासकामांसाठी विशेष अनुदान निधी अंतर्गत महिला पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात येत आहे. महापालिकेने यासाठी ठरावीक जागा निवडल्या आहेत. या कामाचे वर्क ऑर्डरही संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले. अशोक वाटिका चौक परिसरात हे बांधकाम सुरू असताना कुणीतरी अतिक्रमण करतंय, असा समज झाल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरू असलेले बांधकाम जेसीबी मशीनने काढून टाकले.

या प्रकाराबाबत कंत्राटदार मोहन पाटील यांनी प्रशासनाकडे नुकसानभरभाईची मागणी केली असून, महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानेच हे सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्याचे आदेश दिले. परंतु, कोणतीही विचारपूस अथवा चौकशी करता सुरू असलेले बांधकाम पाडण्यात आले. तसेच बांधकाम साहित्यही जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे जवळपास दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, माझे जप्त केलेले साहित्य मला परत द्यावे, तसेच नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी मोहन पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत केली आहे.
बातम्या आणखी आहेत...