आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाला डबल कवच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिका शहरातील नागरिकांना प्राथमिक सोयी-सुविधा सण, उत्सव काळात पुरवेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, नागरिकांचा अपेक्षा भंग झाल्याने महापालिकेने सतर्कतेचे पाऊल उचलली आहेत. एक मुख्य प्रवेशद्वार असताना आता आणखी एक प्रवेशद्वार थाटत पालिकेने स्वत:ला दुसरे कवच जोडले आहे.

मागील दीड वर्षापासून शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधेसाठी तडफडावे लागत आहे. नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी महापलिका कारभारांच्या विरोधात अनेकदा आंदोलनेही केलीत. अनेकदा मनपात तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, पोलिसांना वेळोवेळी पाचारण करण्यात आले आहे.

गणपती उत्सव काळात गणेश भक्तांना आणि नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी काही नगरसेवकांनी मनपा आयुक्त दीपक चौधरी यांना निवेदनेदेखील दिले आहे. मात्र, या निवेदनाला प्रशासनाच्या वतीने केराची टोपली दाखवण्यात आली आहे. शहरातील अनेक मार्गांवर आजही मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यावर सण, उत्सव काळात उपाययोजना केल्या जातील. परंतू, याबाबत नागरिकांची आशा धूसर होताना दिसत आहे.

अनुसूचित प्रकारासाठी गेट
महापालिकेत उठसूट आंदोलनामुळे मोठय़ा प्रमाणात तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. यानंतर ह्या घटना घडू नये यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने दुसरे नवीन गेट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीपक चौधरी, आयुक्त मनपा.