आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला मनपाचा खो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी सुचविलेल्या उपाययोजनांना महापालिकेने केराची टोपली दाखविली आहे. बैठकीनुसार कोणतीही उपाययोजना मनपाने केली नाही.

नागरिकांना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये मनपा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह महत्त्वाच्या शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी विद्युत व्यवस्था, शहरातील पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्यासोबतच आरोग्य सुविधा, मनपा हद्दीतील दिवाबत्ती आदी मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, यांपैकी एकाही समस्या मनपाने सोडवल्याचे जाणवत नाही. त्यामुळे नागरिकांना व गणेश भक्तांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचे काहीही सोयरसुतक महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणाला दिसत नाही.

प्रशासनातर्फे जनतेची दिशाभूल
दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणेश उत्सव पूर्वनियोजनाची बैठक घेण्यात आली. त्यात मनपाकडून आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. प्रशासनातर्फे जनतेची दिशाभूल करण्यात येते.’’ पंकज गावंडे, सचिव वीर भगतसिंग गणेश