आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corproation Two Employee Dismiss In Akola

मनपाचे मनोज सारवान, राजेश इंगळे निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिका आयुक्तांनी शुक्रवार, 26 जुलैला दोन कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित केले. यामध्ये आरोग्य निरीक्षक मनोज सारवान, चौकीदार राजेश इंगळे यांचा समावेश आहे.

कस्तुरबा गांधी महिला रुग्णालयात महापालिका आयुक्त कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. या भागात आयुक्त आल्याचे पाहत महापालिका कर्मचारी राजेश इंगळे यांनी त्या भागातील महिलांना आयुक्तांना भेटण्यास प्रवृत्त केले. यामुळे कार्यालयीन कामकाजात व्यत्यय आणणे, महापालिका प्रशासनाविरुद्ध नागरिकांना भडकावून एकत्र आणणे, आयुक्तांना घेराव घालण्यासाठी महिला व नागरिकांना प्रवृत्त करणे या बाबी कार्यालयीन शिस्तीस व वर्तवणुकीस धरून नसल्याने कस्तुरबा गांधी महिला रुग्णालयातील चौकीदार राजेश इंगळे यांना आज निलंबित करण्यात आले. या रुग्णालयामागे महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. हे स्वच्छतागृह साफ नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका आरोग्य विभागात कार्यरत आरोग्य निरीक्षक मनोज सारवान यांना प्रभाग 24 मधील अस्वच्छतेच्या गंभीर तक्रारप्रकरणी निलंबित करण्यात आले. यामुळे कर्मचार्‍यांत खळबळ उडाली आहे.