आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Coucil Election News In Marathi, Sindkhedraja, Lonar, Divya Marathi

नगरपालिका निवडणूक : सिंदखेडराजात 83 टक्के, लोणारमध्ये 73 टक्के मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेड राजा/लोणार - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रविवारी सिंदखेड राजा व लोणार नगरपालिकांच्या प्रत्येकी 17 जागांसाठी मतदान झाले. लोणारमधील किरकोळ अपवाद वगळता दोन्हीही ठिकाणी शांततेत मतदान झाले. सिंदखेड राजात विक्रमी 83.40 टक्केतर लोणारमध्ये 73 टक्के मतदान झाले. दोन्हीही ठिकाणी सोमवारी मतमोजणी होऊन 124 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.


सिंदखेड राजा पालिकेच्या 17 जागांसाठी 11 हजार 933 पैकी 9 हजार 953 जणांनी मतदानाचा हक्क बजावला तर लोणारमध्ये 15 हजार 922 मतदारांपैकी तब्बल 11 हजार 789 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेसात वाजता सिंदखेड राजातील 20 तर लोणारमधील 29 मतदान केंद्रांवर मतदानास प्रारंभ झाला होता. लोणारमध्ये बोगस मतदानाच्या आरोपावरून झालेला किरकोळ वाद वगळता दोन्ही ठिकाणी शांततेत मतदान झाले. लोणारमध्ये 17 जागांसाठी 75 तर सिंदखेड राजात 49 उमेदवार रिंगणात होते. सोमवारी, 24 मार्चला दोन्ही ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सिंदखेड राजा येथे नगरपालिका टाऊन हॉलमध्ये तर लोणारमध्ये आयटीआय कॉलेजमध्ये सकाळी नऊ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. दुपारी 12 पर्यंत दोन्ही त्यामुळे त्यांचा पत्तादेखील तिथलाच म्हणजे गुवाहाटीचा दाखवण्यात आला आहे. त्यांच्या बनावट रेशनकार्डवर त्यांचा पत्नीसह फोटोही दिसतो आहे. त्यामुळे या कार्डवर अधिका़र्‍यांनी स्वाक्षरी कशी केली असा प्रश्न आहे. या कार्डवर सहायक पुरवठा अधिकारी सुभाष गुप्ता यांची स्वाक्षरी आहे. या कार्डवर दाखवण्यात आलेल्या पत्त्याची शहनिशा केली असता त्या क्रमांकाचे कोणतेच घर त्या ठिकाणी अस्तिवात नव्हते. रोहतकचे जिल्हाधिकारी डॉ. अमित अग्रवाल यांनी सांगितले की, ‘प्रशासनाला अडचणी आणण्यासाठी व त्यांची नामुष्की करण्यासाठी हा खोडसाळ प्रकार केला आहे. या प्रकारासाठी दोषी अधिकार्‍यावर कारवाई केली जाईल.’