आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Council Election News In Marathi, Sindakheda Raja, Lonar

पालिका निवडणूक: सिंदखेड राजात शिवसेना तर लोणारमध्ये काँग्रेस विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेड राजा/लोणार - लोकसभा निवडणुकीचा धुराळा वाढत्या उन्हासोबतच उंच उडालेला असताना जिल्ह्यातील सिंदखेड राजा व लोणार पालिकेसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत लोणारमध्ये काँग्रेस तर सिंदखेड राजामध्ये सेनेनेने आपला झेंडा फडकवला. दोन्ही ठिकाणी नागरिकांनी परिवर्तनाच्या बाजून कौल दिल्याने लोणारमध्ये शिवसेनेला तर सिंदखेडमध्ये राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.


मातृतिर्थ सिंदखेड राजामध्ये 17 जागांसाठ झालेल्या निवडणूकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारून मतदारांनी शिवसेनेला कौल दिला. शिवसेनेचे आठ व एक पुरस्कृत असे नऊ उमेदवार निवडणून आल्याने सिंदखेड राजामध्ये शिवसेनेचे स्पष्ट बहूमत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. अतितटची व प्रतिष्ठेची ठरलेली सिंदखेड राजा पालिकेच्या निवडणूकीत 49 उमेदवार रिंगणात होते. सोमवारी निकालाच्या उत्सुकतेपोटी नागरिकांनी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून नंदा मेहेत्रे यांची नगराध्यक्ष म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.


मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतीवर संचेती सर्मथकांचे वर्चस्व
मलकापूर येथे पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल सोमवार 24 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. यावेळी 17 जागे पैकी आमदार संचेतीच्या आठ सर्मथकांना विजयश्री मिळविला असल्याने सर्मथकात आनंदाचे वातावरण आहे. नांदुरा रस्त्यावरील डबल डायमंड जिनिंग फॅक्टरीच्या आवारात निवडणूक घेण्यात आली. त्याचे निकाल आज जाहीर करण्यात आले. विजयी उमेदवारां पैकी 8 उमेदवार हे आमदार चैनसूख संचेती सर्मथक आहेत. तर केदार एकडे व शिवसेनेचे किशोर नवले, अरुण अग्रवाल यांच्या नेतृत्वातील पॅनलने 6 जागा पटकाविल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुरस्कृत पॅनलने दोन जागा जिंकल्या असून विकास आघाडीच्या वटयाला केवळ एक जागा आली आहे.7 जागे पैकी 8 जागा या संचेती सर्मथकाच्या असल्याने कार्यकर्त्यांच्यावतीने आनंद व्यक्त केला जातो आहे. यावेळी निर्णय अधिकारीचे काम निवासी नायाब तहसिलदार जोशी यांनी काम बघीतले.


लोणारमध्ये कमळ कोमेजले, राष्ट्रवादी शून्य
लोणारमध्येही सत्ताधारी शिवसेना व अपक्षांच्या आघाडीला नाकारत मतदारांनी काँग्रेसला कौल दिला. याही 17 सदस्यीय पालिकेमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले असून 17 पैकी 12 जागावर त्यांनी विजय संपादन केला. दरम्यान आमदार संजय रायमुलकर व नगराध्यक्ष प्रा. बळीराम मापारी यांनी शिवसेनेच्यावतीने आघाडी तयार करून प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढतीमध्ये त्यांना केवळ चार जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपचे कमळ मात्र लोणारात फुलले नाही तर राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही.