आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Department Of PWD ,Latest News In Divya Marathi

सुस्थितीतल्या रस्त्यांवर खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजित रक्कम निर्धारित केली आहे. ही रक्कम क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांच्या नावावर सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर खर्च होणार असल्याचे मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केलेल्या यादीतून स्पष्ट होते.
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने क्षतिग्रस्त झालेले रस्ते व त्यासाठी लागणारा एकूण खर्च, अशी विभागणी केली आहे. यादीमध्ये शहरातील क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांसोबतच सुस्थितीत असणार्‍या मार्गांचादेखील समावेश करण्यात आला आहे. मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या यादीनुसार जठारपेठ चौक ब्राrाण सभा ते दिवेकर वाचनालयापर्यंतच्या रस्त्यांच्या दुरुस्तीवर 79 लाख 92 हजार 371 रुपये, तर दुर्गा चौक ते अग्रसेन चौकापर्यंत असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 91 लाख 51 हजार 703 रुपये नियोजित खर्च दाखवण्यात आला आहे. जठारपेठ चौक ब्राrाण सभा ते दिवेकर वाचनालयापर्यंतच्या मार्गावर केवळ काही ठिकाणीच खड्डे पडल्याचे दिसून येतात, तर उर्वरित मार्गाची स्थिती चांगली असून, या मार्गाच्या दुरुस्तीसाठी मनपाने अंदाजित केलेली रक्कम जास्त ठरत असल्याचे समजते.