आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा कर्मचार्‍यांचा संप स्थगित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेला मनपा कर्मचार्‍यांचा संप आज स्थगित करण्यात आला. भारिप- बमसं नेते अँड. प्रकाश आंबेडकर, महापौर ज्योत्स्ना गवई, संघर्ष समितीचे नेते, प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तो स्थगित करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर मंगळवारी रात्री 11 वाजता संप स्थगित केल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष पी.बी.भातकुले यांनी दिली. बुधवारी याविषयी अधिकृत करार झाल्यानंतर संप मागे घेण्यात येईल, असे ते म्हणाले. संप काळातील कर्मचार्‍यांची हजेरी नियमित करण्यात येईल, असे करारात नमूद करण्यात येणार आहे.

मनपा कर्मचार्‍यांचा 10 जानेवारीपासूनचा संप आज चर्चेअंती स्थगित केला. रात्री 9.30 ते 11 या वेळेत जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या रतनलाल प्लॉटस्थित शासकीय निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर संप स्थगित केला. कर्मचार्‍यांनी नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी हा संप मागे घेण्याची गरज या वेळी व्यक्त केली. त्यानंतर संघर्ष समितीने हा संप मागे घेण्याचे उर्वरित.4महापालिका कर्मचार्‍यांचा मागील दहा दिवसांपासून सुरू असलेला संप स्थगित झाला आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कर्मचारी काम करतील. कर्मचार्‍यांना थकित देणी देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्षता बाळगावी. ज्योत्स्ना गवई, महापौर, महापालिका, अकोला.

करार झाल्यानंतर संप मागे

आज तूर्तास संप स्थगित करण्यात आला आहे. याविषयी प्रशासनासोबत करार झाल्यानंतर प्रत्यक्षात संप मागे घेण्यात येईल. पाचव्या वेतन आयोगाच्या रकमेविषयी नाराजी आहे. संप तूर्त स्थगित केला. वेतनासोबत पाचव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम अदा करण्यात येईल. पी.बी.भातकुले, अध्यक्ष, संघर्ष समिती मनपा.

महापालिकेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनी कर भरण्याची गरज आहे. यासाठी विशेष कर वसुली मोहीम हाती घेण्यात येईल. कर वसुली करताना कर्मचार्‍यांना टार्गेट देण्यात येईल. ज्यांचे टार्गेट पूर्ण होणार नाही त्यांना नियमानुसार दंड करण्यात येईल. घनकचरा उचलण्यासाठी टननुसार निविदा काढण्यात येईल तसेच 312 कोटींच्या भूमिगत गटार योजनेच्या तांत्रिक मान्यतेस तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. नागरिकांच्या वाढत्या अडचणी पाहता हा संप मिटवण्याची गरज होती, त्यासाठी मार्च अखेरपर्यंत कर्मचार्‍यांची सर्व देणी देऊ. अँड. प्रकाश आंबेडकर, नेते भारिप-बमसं.

कामकाज सुरळीत करू

मनपा कर्मचार्‍यांचा गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेला संप आज रात्री 11 वाजता स्थगित केला. त्यामुळे बुधवारपासून मनपाचे कामकाज नियमित होईल. स्थानिक संस्था कराचे अनुदान म्हणून आलेल्या चार कोटी रुपयांच्या निधीचा वापर हा कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी व भत्ते अदा करण्यासाठी करण्याबाबत शासनाचा आदेश आल्यावर देण्यात येईल. डॉ. उत्कर्ष गुटे, प्रभारी आयुक्त, महापालिका,अकोला.