आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका शाळेतील स्वच्छतागृहांची दुरवस्था, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सर्वशिक्षाअभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकातील बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. यासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा खर्चही करण्यात येत आहे. मात्र, शहरातील बऱ्याच शाळांमध्ये सोयी-सुविधांची ऐशीतैशी झाली आहे. दिवसातील पाच ते सहा तास शाळेत घालवणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य स्वच्छतागृहाच्या दुरवस्थामुळे धोक्यात आले आहे.
महापालिका शाळांमध्ये उत्तम वर्ग खोल्या, खेळण्यासाठी मैदान, इतर सर्व सुविधा आहे. बाहेरून उत्तम दिसणाऱ्या शाळा इमारतींची खऱ्या अर्थाने ‘बाहर से टामटूम अंदरसे रामजाने’, अशी अवस्था झाली आहे. महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे असूनही नसल्यासारखीच आहेत. दुर्दैवाने ही सत्य परिस्थिती आहे. अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत. चांगल्या अवस्थेतही आहेत. पण, अशा सर्व स्वच्छतागृहांना मात्र कुलपांचे संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहांचा विद्यार्थ्यांना उपयोग घेता येत नाही, तर कुलूपमुक्त स्वच्छतागृहांची परिस्थिती विदारक अाहे. सर्वत्र घाण, दुर्गंध, साचलेला कचरा, अशा भयानक वातावरणात चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपला कार्यभाग उरकावा लागतो.
या बोलक्या चित्रामुळे शाळा व्यवस्थापनाला बालकांच्या ‘राइट टू पी’ या अधिकाराचा विसर पडला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुिवधा मिळाव्यात, विशेषत: प्रत्येक शाळेत मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळे स्वच्छतागृहे असावे, असा निर्णय शासनाने एस. एन. एन./ १०९९/ (२४०/९९) उमाशि-२ दिनांक २२ डिसेंबर २००० नुसार जारी केला. परंतु, हा शासन निर्णय कागदोपत्रीच राहिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे.
आरोग्यासाठी घातक
स्वच्छताआणि आरोग्याचा जवळचा संबंध असल्याने अस्वच्छ स्वच्छतागृहांचा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. अस्वच्छतेमुळे युरीन इन्फेक्शन होते. शिवाय बरेच आजारसुद्धा होतात. तसेच याचा किडनीवरदेखील दुष्परिणाम होतो.'' डॉ.अमरदीप वाघ, बालमेंदूतज्ज्ञ.