आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समायोजनाचा फटका चांगल्या शाळेलाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- खासगीशाळांना एकमेव आव्हान देणारी महापालिका शाळा क्रमांक २६ मधील विद्यार्थ्यांवर शैक्षणिक नुकसानीचे संकट कोसळले आहे. महापालिका शाळांमध्ये जे ३० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, त्यात या शाळेतील तीन शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या शाळेत या शैक्षणिक वर्षापासूनच इयत्ता नववा वर्ग सुरू करण्यात आला आहे.
या भागातील नगरसेवक दिलीप देशमुख, शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे महापालिका शाळांमधील ही शाळा एकमेव दर्जेदार ठरली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. नववा वर्ग सुरू झाल्याने या शाळेत तासिकेनुसार बीएड शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी नगरसेवकांसह पालकांनी केली आहे. ही मागणी अद्याप मार्गी लागली नसताना, अतिरिक्त ठरलेल्या ३० शिक्षकांमध्ये या शाळेतील तीन शिक्षकांचा समावेश केला आहे, तर दोन नावे वेटिंगवर आहेत. त्यामुळे या शाळेतील पाच शिक्षक कमी होणार आहे. शिक्षकांच्या या बदल्यांमुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.