आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा शाळा झाल्या उजाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेच्या अनेक शाळांची दुरवस्था झाली आहे. काही शाळांमधील स्लॅब क्षतिग्रस्त झाल्याने पावसाळ्यात एखादवेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 2013-2014 या आर्थिक वर्षात शाळा दुरुस्तीवर फारसा खर्चही झालेला नाही. महापालिकेच्या मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या एकूण 55 शाळा असून, इमारतींची संख्या 35 आहे. यापैकी अनेक शाळा इमारतींची दुरवस्था झाली आहे. यात प्रामुख्याने महापालिका मराठी कन्या शाळा सात, मराठी मुलांची शाळा क्रमांक सात, हिंदी कन्या शाळा चार, मराठी मुलांची शाळा क्रमांक 18, हिंदी बालक क्रमांक आठ, मराठी मुलांची शाळा क्रमांक 19 आदी शाळा प्रामुख्याने क्षतिग्रस्त झाल्या आहेत. शाळांना उन्हाळ्याची सुटी लागल्याने शाळा बंद असताना अनेक शाळांमधील वर्ग खोल्यांचे दरवाजे मात्र सताड उघडे आहेत. त्यामुळे वर्गातील पट्टय़ाही भुरट्या चोरांनी लंपास केल्या आहेत. वर्गात सर्वत्र कचरा निर्माण झाला आहे. शाळेतील सीलिंग फॅनही वाकवण्याचा प्रयत्न केला आहे, तर काही शाळांमधील वर्ग खोल्यांच्या खिडक्याच लंपास केल्या आहेत.
शाळा परिसरात अतिक्रमण

अकोटफैल भागातील मराठी मुलांची शाळा क्रमांक 18 मधील जागेत अतिक्रमण करून टिनशेड उभारण्यात आले आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी महापालिका शिक्षण विभागाला अतिक्रमण केल्याबाबत तक्रारही दाखल केली असल्याची माहिती मिळाली आहे, तर हरिहरपेठेतील मराठी मुलांची शाळा क्रमांक 19 मधील चौकीदार निवृत्त झाल्यानंतर त्याने निवासस्थान सोडले. या निवासस्थानावर काही नागरिकांनी ताबा मिळवला आहे.