आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipality News In Marathi, Encroachment Issue At Akola, Divya Marathi

अतिक्रमित बांधकामावर मनपाने केली कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आरटीओ रोडवरील पीठगिरणी व्यावसायिकाच्या अतिक्रमणात असलेल्या जिन्यावर बुधवार, 26 मार्च रोजी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे कारवाई करण्यात आली. हे अनधिकृत बांधकाम मनपाच्या पथकाने पाडले.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख र्शीरंग पिंजरकर यांनी सर्वच अवैध बांधकामांवर कारवाई करा, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीमुळे काही वेळ येथे कारवाई झाली नाही. पण, तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीनुसार असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील सव्र्हे क्रं. 31/1, भूखंड क्रं. 11, आरटीओ रोडवरील संतोष मसने यांचे बांधकाम अतिक्रमित असल्याची तक्रार दत्तात्रय बाळापुरे यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अतिक्रमण निर्मूलन विभागाने 26 मार्च रोजी संतोष मसने यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. लोकशाही तक्रार निवारण केंद्रामार्फत तक्रारीचे निवारण झाले आहे. त्यामुळे यापुढे कुठलीही तक्रार नसल्याचे तक्रारकर्ता दत्तात्रय बाळापुरे यांनी लिहून दिल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख डोंगरे यांनी सांगितले. ही कारवाई क्षेत्रिय अधिकारी कैलास कुंडे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख विष्णू डोंगरे, प्रवीण मेर्शाम, विजय वळोणे, संजय थोरात, दिनेश गोपनारायण, सुरक्षा गार्ड रूपेश इंगळे आदींनी केली.