आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रवालांचे नकाशे झाले रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेने अवैध बांधकामांवर हातोडा चालवला असताना आता महापालिकेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून रस्ता बळकावणार्‍या तिघांचा बांधकाम नकाशा नगररचनाकारांनी रद्द केला. या प्रकरणात प्लॉट विकणार्‍या व डीपी रस्ता गिळंकृत करणार्‍या बाजोरियांवर कोण कारवाई करणार असा प्रश्न या भागातील तक्रारकर्त्यांनी विचारला आहे.
मौजे उमरी भागातील सव्र्हे क्रमांक 34।1 च्या मंजूर अभिन्यासातील भूखंड क्रमांक 11, 12, 13 (हिस्सा) वर संजय अग्रवाल यांनी याच सव्र्हे क्रमांकातील भूखंड क्रमांक 10, 11 (हिस्सा) वर सीमा महेंद्र अग्रवाल तसेच भूखंड क्रमांक 9, 10 (हिस्सा) वर अशोक अग्रवाल यांनी बांधकाम करण्यासाठी 31 मार्च 2008 ला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला तीन मे 2008 ला मंजुरी प्रदान केली होती. परंतु, या भूखंडावरील आवारभिंत विकास योजनेनुसार रस्त्याच्या जागेत येत असल्याची बाब सिद्ध झाली आहे. भूखंडाचा प्रथम अभिन्यास 60 फूट विकास योजना रस्त्याप्रमाणे मंजूर झाला असून, सुधारित अभिन्यासात हा रस्ता 30 फूट रुंदीचा दर्शवला आहे व त्यानुसार बांधकाम नकाशे सादर केले होते. तथापि मंजूर विकास योजनेनुसार रस्त्याची रुंदी 12 मीटर आहे. परिणामी, सादर केलेले नकाशे दिशाभूल करणारे आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 51 (1) अन्वये तीन मे 2008 ला परवानगी आदेश व नकाशे का रद्द करण्यात येऊ नये, याबाबत 27 सप्टेंबर 2013 ला नोटीस बजावण्यात आली होती.
स्पष्टीकरण अमान्य
या नोटीसचे एक सप्टेंबर 2013 ला सादर केलेले लेखी स्पष्टीकरण अमान्य केले आहे. त्यामुळे विकास परवानगी आदेश व नकाशे रद्द करण्याचे आदेश या तिघांनाही नगररचना विभागाने बजावले आहेत.

महापालिकेची दिशाभूल केल्याचा ठपका
हे कसे : उपविभागीय अधिकार्‍यांच्या कार्यालयात 28 डिसेंबर 1992 मध्ये अतिरिक्त जमीन असल्याने त्याचा वापर करण्याबाबतचे पत्र आले. हे पत्र 20 डिसेंबर 1992 रोजी लिहिले होते. तर 20 डिसेंबर रोजी केलेला अर्ज 28 डिसेंबर रोजी एसडीओ ऑफीसला प्राप्त होतो. पण, हा अर्ज प्राप्त झाल्याचे गृहित धरत त्यावर 24 डिसेंबर 1992 रोजी ऑर्डर शिट लिहिल्या गेली. या ऑर्डर शिटवर नकाशाची प्रत ही 24 जुन 87 असून इंग्रजीत असलेल्या अर्जात 24 डिसेंबर 87 मंजूर नकाशा असा उल्लेख आहे. तो कसा ? असा प्रश्न या भागातील तक्रारकर्त्यांना पडला आहे.
हे कसे : मौजे उमरी प्र.अकोला येथील शेत स.न.34/1 च्या 24 डिसेंबर 1987 रोजी मंजूर नकाशात दर्शवलेला 18 मीटरचा प्रस्तावित डी.पी. रोड. तर दुसर्‍या छायाचित्रात दिनांक 8 फेब्रुवारी 1993 नुसार सुधारित नकाशात दर्शवलेला 9 मीटरचा डी.पी. रोड. त्याच बरोबर या छायाचित्रात प्लॉटची पूर्व ते पश्चिम रुंदी वाढल्याचे स्पष्टपणे दिसते. सातबारावर 37 गुंठे असताना 43 गुंठय़ांचे प्लॉट कसे करण्यात आले. येथे ओपन स्पेस सोडली नसल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.