आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या मुलाचा अपघात नसून खून- पित्याने घेतला आक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बोरगाव येथील अजमेरा जिनिंग फॅक्टरीच्या आवारात एका २३ वर्षीय युवकाचा ११ नोव्हेंबर २०१४ रोजी ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी नातेवाइकांची फिर्याद दाखल करून घेता स्वत: फिर्यादी बनून पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, या सर्व घटनेवर त्या युवकाच्या पित्याने आक्षेप घेतला असून, माझ्या मुलाचा अपघात नसून, त्यांच्या डोक्यात वार करून त्याला ठार मारले, असा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे.

अजमेरा जिनिंग फॅक्टरीमध्ये फिरोज शहा महेमूद शहा (वय २३) हा गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो. ११ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे तो रात्रपाळीच्या कामावर गेला होता. त्याच दिवशी रात्री ३.३० वाजताच्या सुमारास फिरोज हा काम करून थकला होता आणि फॅक्टरीच्या आवारातच झोपला होता. त्याअवस्थेत त्याच्या अंगावरून रवी बबनराव पुरी याने ट्रॅक्टर नेला त्यात फिरोज शहा जखमी झाला, अशी तक्रार पोलिसांनी नोंदवली त्यानंतर गुन्हा दाखल केला.

मात्र, अपघात घडल्यानंतर फिरोज शहा याच्या आईवडिलांना तसेच त्याच्या नातेवाइकांना पोलिसांनी काहीही माहिती देता सर्व सोपस्कार पार पाडले.
घटनेची माहिती मिळताच सकाळी फिरोज शहा याचे वडील महेमूद शहा नजीम शहा नातेवाइकांनी सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. त्यांना त्यांचा मुलगा शवविच्छेदनगृहातच दिसला.

या वेळी त्यांनी मुलाचे काही छायाचित्र घेतले असता. पंचनाम्यामध्ये घेतलेल्या नोंदीची तफावत असल्याचा आरोप महेमूद शहा नजीम शहा यांनी केला. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत महेमूद शहा नजीम शहा यांनी अजमेरा फॅक्टरीच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या वेळी पत्रकार परिषदेला रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव डी. गोपनारायण, संतोष गवई आणि अजय प्रभे उपस्थित होते.
न्याय मिळाल्यास २५ जानेवारी रोजी उपोषण : आपलाकमावता मुलगा गेला आहे. तो कुटुंबाचा आधार होता, त्याची हत्या करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अन्यथा आपण २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

या आहेत संशयास्पद बाबी
पोलिसांनीकेलेल्या पंचनाम्यामध्ये युवकाच्या अंगावरून ट्रॅक्टरचे मागील चाक गेले. त्यात तो जखमी झाला आणि त्याच्या मासाचे तुकडे पडले होते, असे नमूद आहे. मात्र, शवविच्छेदन गृहात युवकाचे काढलेल्या फोटोमध्ये त्याच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याचे दिसत नसून, त्याच्या डोक्यातून आणि नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून येते. तसेच युवकाचे आईवडील बोरगाव येथेच राहत असताना त्यांना तत्काळ घटनेची माहिती का देण्यात आली नाही आणि गुन्ह्याची नोंद घेण्यासाठी पोलिसांनी नातेवाइकांची तक्रार का दाखल केली नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहे.