आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पिण्याच्या वादातून एकाची हत्या; जुन्या शहरामध्ये तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जुन्याशहरातील नबाबपुरा येथील एका व्यक्तीला दारूच्या दुकानावर तीन ते चार जणांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला धाबेकर फार्म हाऊसच्या बाजूला लोणीरोडच्या एका शेतात नेऊन टाकण्यात आले. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत असून, मृतकाच्या पत्नी आणि मुलाने पोिलसांवर आरोप केला आहे.
रऊफ खान सलीम खान (वय ४२ वर्षे), असे मृतकाचे नाव आहे. रऊफ खान याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तो सोमवारी रात्री १०.३० वाजता पोळा चौकातील देशी दारूच्या दुकानावर दारू पिण्यासाठी गेला होता. या वेळी त्याला तीन ते चार लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रऊफ खान सलीम खान हा जखमी अवस्थेत धाबेकर यांच्या फॉर्महाऊसजवळील शेतात आढळून आला. शिवसेना वसाहत येथील एका व्यक्तीने जुने शहर पोलिसांना मंगळवारी सकाळी माहिती दिली. पोिलस घटनास्थळी पोहोचले. रऊफ खान सलीम खान याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जुने शहर पोिलसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोिलसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. या घटनेमुळे जुने शहरात तणाव निर्माण झाला होता.
तडीपार करणार होतो
-रऊफखान सलीम खान याच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहोत. एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृतकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तडीपारीचा प्रस्तावही तयार करण्यात येणार होता. मारहाणीत पोिलसांची काहीही संबंध नाही. -चंद्र िकशोर मीणा, पोिलसअधीक्षक