आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगीतम ट्रॅव्हल्सच्या मालकाची हत्या; कौटुंबिक, संपत्ती वादाची किनार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जयंतीलाल मिश्रा)
अकोला- संगीतम ट्रॅव्हल्सच्या मालकाची हत्या झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर फावडे मारल्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. कौटुंबिक तसेच संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जयंतीलाल उर्फ जगदंबा प्रसाद मिश्रा (वय ७० वर्षे) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. जयंतीलाल हे जठारपेठेतील दिवेकर चौकाजवळ राहतात. त्यांच्या मालकीची खुली जागा ही दुर्गा चौकातील भागवतवाडीतील खान्देश दूध डेअरीजवळ आहे. येथे ते नित्यनियमाने रात्री झोपायला जात असत. शुक्रवारी रात्री जयंतीलाल मिश्रा हे जेवण आटोपून झोपायला भागवतवाडीमध्ये असलेल्या घरी गेले. रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञातांनी लोखंडी दार उघडले आणि बाजूलाच असलेले फावडे जयंतीलाल यांच्या डोक्यात घातले. या वेळी त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. सकाळी वाजताच्या दरम्यान ते घरी आल्यामुळे त्यांचा मुलगा सुहास उर्फ पप्पू मिश्रा यांनी वडिलांना फोन केला. मात्र, प्रतिसाद आल्यामुळे त्यांनी त्यांचा पुतण्या अक्षय मिश्रा याला घटनास्थळी पाठवले. अक्षय घटनास्थळावर पोहोचताच त्याला रक्ताने माखलेल्या अवस्थेत जयंतीलाल मिश्रा दिसून आले.
त्यांनी काका पप्पू मिश्रा यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनासुद्धा माहिती दिल्यानंतर रामदासपेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अक्षय संजय मिश्रा यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी भगीरथ उर्फ परमानंद मिश्रा, हेमंत भगीरथ मिश्रा, अमोल भगीरथ मिश्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१० मार्च रोजी झाला होता मुलावर जीवघेणा हल्ला : १०मार्च २०१५ रोजी जयंतीलाल मिश्रा यांचा मुलगा पप्पू मिश्रा याच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री १० वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. निमवाडी येथे असलेल्या त्यांच्या संगीतम ट्रॅव्हल्समधून कामकाज आटोपून ते घरी जात होते. या वेळी त्यांच्या डोक्यावर अाणि पायावर लोखंडी रॉडने मारून जखमी केले होते. त्यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. याप्रकरणी त्यांचे चुलत भाऊ हेमंत मिश्रा अमित मिश्रा यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते कारागृहात आहेत.
श्वानपथक आणि इन्व्हेस्टिगेशन पथकाने केली चौकशी : घटनेचीमाहिती मिळताच घटनास्थळावर श्वान पथक आणि इन्व्हेस्टिगेशन पथकाला पाचारण करण्यात आले. घटना स्थळापासून श्वान पथक जास्त दूर जाऊ शकले नाही, तर इन्व्हेस्टिगेशन पथकाने रक्ताचे नमुने आणि घटनास्थळाचे काही बारकावे टिपले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, भिंतीवर उडाले रक्ताचे फवारे...वहिनीच्या खुनातून सुटका...