आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेला जाळून मारले; पती, सासू-सासऱ्यास जन्मठेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मावशीच्याघरून उशिरा का आली, म्हणून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारल्याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यास जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बार्शिटाकळी तालुक्यातील कानडी येथे कांता उर्फ क्रांती गणेश पवार हिचा १२ मे २०१३ रोजी जळून मृत्यू झाला होता.
वाशीम जिल्ह्यातील काजळेश्वर येथील कांताचा विवाह पिंजरपासून जवळच असलेल्या कानडी येथील गणेश लक्ष्मण पवार याच्यासोबत २०१० मध्ये झाला. लग्नानंतर पाच-सहा महिन्यांनी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा तिच्याकडे लावण्यात आला. माहेरहून पैशाची व्यवस्था होऊ शकल्यामुळे येनकेन प्रकारे पती गणेश लक्ष्मण पवार, सासरा लक्ष्मण लालसिंग पवार आणि सासू रेणुका लक्ष्मण पवार यांनी तिचा छळ सुरू केला. त्यामुळे चार वेळा कांता आणि गणेश यांच्यामध्ये आटही पडला होता. मात्र, नातेवाइकांनी मध्यस्थी करत त्यांचा संसार सुरळीत सुरू झाला. अशातच कांता आणि गणेश यांना दोन मुले झालीत. १२ मे २०१३ रोजी कांताच्या मावशाची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी ती तिच्या मुलासह मावशीकडे गेली हाेती. रात्री तिला घरी येण्यास उशीर झाल्यामुळे पती गणेश आणि सासू-सासऱ्यांनी ितच्यासोबत वाद घातला. या तिघांनीही तिला मारहाण केली रात्री वाजताच्या सुमारास कांताच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळले. त्यात ती ८८ टक्के भाजली. त्यानंतर तिला सर्वोपचार रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आल होतेे. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोिलसांना आणि तहसीलदारांना कांतानेे दिलेल्या बयाणामध्ये पती, सासरा आणि सासू या तिघांनी संगनमत करून जाळून मारल्याचे तिने सांगितले होते. यावरून पिंजर पोलिस ठाण्यातध्ये पती गणेश पवार, सासरा लक्ष्मण पवार आणि सासू रेणुका पवार यांच्यािवरुद्ध कांताचे वडील रामेश्वर चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून ४९८ अ, ३०४ आणि ३०२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली असता, सरकारी पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात रामेश्वर चव्हाण, अकोल्याचे तहसीलदार चंद्रकांत पोहरे, दोन डॉक्टर, ठाणेदार वसंत सोनोने यांचा समावेश आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने तीनही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा प्रत्येकी एक हजार रुपये दंड दंड भरल्यास दाेन महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. मंगला पांडे यांनी, तर आरोपीच्या वतीने अॅड. मुन्ना खान यांनी काम पाहिले.
राम, कृष्ण झाले अनाथ
कांताचाआठ महिन्यांचा कृष्ण अाता दीड वर्षाचा आहे, तर दुसरा मोठा मुलगा राम हा अडीच वर्षांचा होता. दोन्ही मुले आपल्या आईला मुकली अाहेत तसेच वडील आणि आजी-आजोबा कारागृहात राहणार असल्यामुळे राम-कृष्ण अनाथ झाले आहेत.