मूर्तिजापूर- मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ खासदार तथा सिने अभिनेत्री हेमामालिनी यांची जाहीर सभा 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शहरातील बियाणी जिन प्रांगणात होईल.
सभेला महिला आघाडी जिल्हाध्यक्षा भारती गावंडे, महापौर उज्ज्वला देशमुख, माजी महापौर सुमनताई गावंडे, जि. प. सदस्य मायाताई कावरे, शुभांगी खंडारे, सुहासिनी धोत्रे, शालिनी हजारे, डॉ. सुजाता मुलमुले, शोभा रेलकर, विजया कंझरकर, स्नेहा नाकट, भावनाताई सदार, स्मिता गावंडे, नूतन पिंपळे आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.