आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Murtijapura Assembly Elections,latest News In Divya Marathi

मूर्तिजापुरात काट्याची लढत, उमेदवार पाहूनच होणार मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- महायुती-आघाडीचेझालेली तुटातुट परिणामी स्वबळावर लढवावी लागणारी निवडणूक प्रत्येक उमेदवारासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. उमेदवारांच्या प्रचारात अनुपस्थित राहून इतके दिवस सुस्त बसलेले दिग्गजही आता आपापल्या उमेदवारांसोबत प्रचारात उतरल्याने खरी रंगत चढली आहे. प्रचाराला जेमतेम सात दिवस उरल्याने मतदार संघातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा मतदार संघ राखीव असल्याने या मतदार संघात जातीय समिकरणे काम करणार नाही. त्यामुळे केवळ उमेदवार पाहूनच मतदान होण्याची शक्यता आहे.
१९९० पर्यंत हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतू १९९० मध्ये अपक्ष उमेदवार मखराम पवार यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. तर १९९५ ला मोतीराम लहाने यांनी भाजपला हा मतदार संघ मिळवून दिला. परंतू २००४ मध्ये हा मतदार संघ राष्ट्रवादीने खेचला. १९९० ते २००९ या दरम्यान कॉंग्रेसला हा मतदार मिळविता आला नाही. २००९ पासून हा मतदार संघ राखीव झाला. २००९ च्या निवडणूकीत भाजपचे हरिष पिंपळे यांनी बाजी मारली. हरीश पिंपळे यांच्यावर काही जणांची नाराजी सोडल्यास ग्रामीण भागात त्यांनी केलेली विकासकामे स्थानिक उमेदवार असणे त्यांची जमेची बाजू आहे. तसेच मोदी लाटेचा फायदा त्यांना होऊ शकतो. राष्ट्रवादीचे डॉ. सुधीर विल्हेकर वैद्यकीय क्षेत्रातील असून, त्यांना पक्षातून चांगली साथ आहे. भारिपचे राहुल डोंगरे हे मूळचे अकोल्याचे रहिवासी असल्याने निवडणुकीपूर्वी त्यांचा चेहरा कधीही मतदारसंघात झळकला नाही. मात्र, पक्षश्रेष्ठींनी फायनल केलेली उमेदवारी राहुल डोंगरेंसाठी लाभाची असून, भारिपची गठ्ठा मते त्यांना वरदान ठरतील, तर शिवसेनेचे उमेदवार महादेवराव गवळेही उमेदवार आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघातील शिवसेनेचे कट्टर समर्थक त्यांच्या पाठीशी आहे. काँग्रेसकडून अटीतटीच्या परिस्थितीत श्रावण इंगळे यांनी उमेदवारी मिळवली. मात्र, काँग्रेसचे मतदारसंघात काहीच अस्तित्व नसल्याने, तर दुसरीकडे मित्र पक्षदेखील प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात असल्याने त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांचा राहिलेला जनसंपर्क आता फक्त कामात येऊ शकतो. या प्रमुख पक्षांसोबतच प्रथमच मनसेचे रामा उंबरकार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनसेची मतदारसंघात मजबूत, अशी बांधणी नसल्याने केवळ राजप्रेमी मराठी अस्मितेचा मुद्दा उंबरकार यांच्या मतांमध्ये भर पाडू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असूनही त्याचा लाभ राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर होईल, असे दिसत नाही. कारण, शहरातील राजकारण पक्षाला पाहून नव्हे, तर उमेदवाराला पाहून होते.
प्रचाराला काही दिवस उरल्याने प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीकडून २००९ ची निवडणूक लढवणाऱ्या प्रतिभा अवचार यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादी भारिप-बमसंसाठी त्या आव्हानात्मक ठरू शकतात, तर भारिपचे नगरसेवक संदीप सरनाईक यांनी पक्षाची उमेदवारी मिळाल्याने बंडखोरी केली आहे. त्यामुळे भारिपच्या उमेदवाराला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारिपच्या गठ्ठा मताला ते खिंडार पाडतील. भारिपचे होणारे मत विभाजन महत्त्वाचा मुद्दा आहे, तर भाजपसाठी मित्र पक्ष शिवसेनाच आव्हान देत आहे.