आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Murtijapura National Highway Police Chowkies Closed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहनधारक त्रस्त, मूर्तिजापूर महामार्गावरील पोलिस चौक्या बंदच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील कारंजा टी पॉइंट अमरावती - कारंजा भडशिवणी चौफुलीवरील महामार्ग पोलिस चौकी मागील सात वर्षांपासून कर्मचाऱ्यांअभावी बंद पडल्याची माहिती आहे. महामार्गावर वाहतूक पोलिस नसल्यामुळे वाहनधारक मनमानीपणे कुठेही वाहने पार्क करत असतात. परिणामी, त्याचा फटका अन्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून या दोन्ही पोलिस चौक्या सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रमुख संजय गुप्ता यांनी केली आहे.
महामार्गावर रात्री-अपरात्री होणाऱ्या अपघातांमुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडतात. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात महामार्ग पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते. मात्र, मागील काही वर्षांपासून गृहमंत्रालयाकडून वाहतूक पोलिसांच्या नियुक्त्या रखडल्याने जिल्ह्यातील प्रमुख म्हणून गणल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दोन पोलिस चौक्या सात वर्षांपासून बंद पडल्या आहेत. या पोलिस चौकींच्या जागेचा वाहनधारक वाहने पार्किंगसाठी वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, ही चौकी महामार्ग पोलिस विभागांतर्गत येत असल्याची माहिती मिळाली आहे. या दोन्ही चौक्या बंद असल्याने महामार्गावर लहान मोठ्या अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूकही विस्कळीत होऊन अन्य वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
राष्ट्रीय महामार्ग बनला धोकादायक
बोरगावमंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील २५ किमी राष्ट्रीय महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात होण्याचे सत्र सुरूच आहे. बाभुळगाव, डोंगरगाव, वाशिंबा, वणीरंभापूर, दाळंबीपर्यंतच्या या महामार्गावर अनेक ठिकाणी असलेले नागमोडी वळण बंगाली बाभळी अपघातास कारणीभूत ठरत आहेत. विशेष म्हणजे, महामार्गावर वसलेली गावे, शाळा या ठिकाणी गतिरोधक तर लावले मात्र त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळेही वाहने उसळून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत.
जानेवारी ते २७ मेपर्यंतच्या कालावधीत गंभीर १४ अपघातांची नोंद बोरगावमंजू पोलिसांनी घेतली आहे. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू, ११ जणांना कायमचे अपंगत्व तर शेकडो किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या महामार्गावर अपघात झाल्यास जखमींच्या उपचाराकरिता बोरगावमंजू येथे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे. त्यामुळे या गंभीर विषयांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.