आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • NAFED' Purchase Of Government Tur Started At Akola

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नाफेड’मार्फत शासकीय तूर खरेदी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत शासकीय तूर खरेदीला शुक्रवार 7 फेब्रुवारीपासून प्रारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नायगाव गोदाम क्रमांक - 8 येथे तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष डॉ. अनंतराव भुईभार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे होते. या वेळी जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी, केंद्रप्रमुख एस. एन. गावंडे, तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक नरेंद्र वैराळे, अजाबराव डोंगरे, ज्ञानेश्वर पारडे, बाजार समिती सचिव सुनील मालोकार, सुरेश कराळे आदी उपस्थित होते. अनकवाडी येथील शेतकरी मोहन बुटे यांनी या योजनेत तूर विक्रीचा प्रथम मान मिळवला. या वेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, र्शीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या तुरीला 4,300 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. शेतकर्‍यांनी आपली तूर पीकपेर्‍यासह सात/बारा, ओळखपत्र इ कागदपत्रांसह एफएक्यू प्रतीची संपूर्ण वाळवूून 12 टक्के आद्र्रतेची तपासणी करूनच विक्रीस आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.