आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोटातून 'नागवेली' नामशेष होण्याच्या मार्गावर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - पानखाये सय्या हमारो' या ऑल टाइम हिट गाण्यातील विड्याच्या पाना (नागवेली) चे उत्पादन अकोटातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.'मर' रोगामुळे पानमळे उद्ध्वस्त होत आहेत. विविध कीटकनाशके वापरूनही रोग आटोक्यात आल्यामुळे पान उत्पादकांनी दुस-या पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

बारी समाज अनेक वर्षांपासून शेकडो एकर जमिनीवर पानमळ्यांची लागवड करत आहे. अकोटमधून विड्याची पाने थेट मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथे जात होती. आता मात्र अर्धा ते एक एकरावरच पानमळ्यांचे क्षेत्र उरले आहे. "मर' रोगाने पानमळा उत्पादकांचे कंबरडेच मोडल्यामुळे त्यांनी विड्यांचे उत्पादन थांबवले. त्यामुळे तरुण पिढीला पानमळ्यांची मशागत-लागवड कशी करावी, याबाबतच्या प्रात्यक्षिकाचे ज्ञान मिळाले नाही. कपुरी पानाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत होती. आता अकोटात आंध्र प्रदेश बाहेरून पाने येतात. या पानांची हर्राशी मोठे बारगण परिसरातील पान अटाई भागात होते. पूर्वी पानांचे घाऊक विक्रेते दलाल २५ होते. आता ती संख्या चारवर आली आहे.

'मर' रोगाने आमचे मरण
'मर'रोगाने पानमळे उद्ध्वस्त झालेत. गत ४० वर्षांपासून पानविक्रीचा ठोक व्यवसाय करत आहे. मात्र, आता हा व्यवसाय डबघाईस आला आहे. श्रीरामनाठे, पान अडते