आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीटाकळी येथे नगर पंचायत स्थापन करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शिटाकळी- बाशिर्टाकळी व लगतच्या परिसराचा विकास व्हावा, यासाठी येथे नगर पंचायत स्थापन करावी, अशा मागणीचे निवेदन बार्शिटाकळीच्या नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, शासनाने महाराष्ट्रातील 138 तालुक्यांचे मुख्य ठिकाण असलेल्या गावांना नगर परिषद व नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे ठरवले असून, त्यामध्ये बार्शिटाकळी येथे नगर पंचायत स्थापनेविषयी भूमिका स्वागतार्ह आहे. बाशिर्टाकळी शहराला नगर पंचायत होणे, अत्यंत गरजेचे आहे. कारण बार्शिटाकळी शहराची लोकसंख्या 21 हजारांपेक्षा जास्त असून, वाढती लोकसंख्या पाहता शहरात पिण्याचे पाणी, अरुंद रस्ते, सांडपाण्याची विल्हेवाट, आरोग्य व परिवहनाची असुविधा या व इतर अनेक समस्यांनी हा तालुका मागासलेला आहे. सन 1980 मध्ये बार्शिटाकळी तालुक्याची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत शहराचा विकास पाहिजे तेवढय़ा प्रमाणात झालेला नाही. ग्रामपंचायतींना मिळणारा अत्यल्प निधीमुळे गावाच्या विकास कार्यामध्ये अडचणी निर्माण होतात. या सर्व बाबींचा विचार करता बार्शिटाकळी येथील सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी सोबत येऊन नगर परिषद व नगर पंचायतीसाठी शासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव पाठवलेले आहेत.
बार्शिटाकळी ग्रामपंचायतीनेसुद्धा 14 फेब्रुवारी 2014 रोजी मासिक सभा घेऊन तसा ठराव सर्व संमत्तीने पारित करून घेतला व प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यावर आलेल्या हरकती व आक्षेपांवर कोणताही विचार करण्यात येऊ नये. कारण बार्शिटाकळी गावाचा विकास होणे महत्त्वाचे आहे. या निवेदनावर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शारीक शेख, माजी सरपंच आसीफखान अलीउल्लाखान, माजी सभापती बिसमिल्ला खान सरफराज खान, जिल्हा कॉंग्रेसचे सदस्य शेख अजहर शेख जमीर, शिवसेना शहरप्रमुख रमेश वाटमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सय्यद नईम, भारिप-बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष अयाजखॉं कबीरखॉ यांच्यासह 850 जणांच्या सहय़ा आहेत.