आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nanded Amrutsatr Railway Issue At Akola, Divya Marathi

नांदेड-अमृतसर रेल्वे गाडीला अकोला थांबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे आणि उत्तर रेल्वे मार्गावर हुजूर साहेब नांदेड-अमृतसर-नांदेड ही समर स्पेशल प्रीमियम गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीला अकोला थांबा दिला आहे.

विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रिजने अमृतसरसाठी कायमस्वरूपी दररोज गाडीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर नांदेड-अमृतसर-नांदेड ही समर स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. ही गाडी शुक्रवार 9 मे आणि 6 जून रोजी नांदेड येथून सकाळी 11:15 वाजता सुटेल. अमृतसर येथून ही गाडी 7 मे आणि 4 जून रोजी दुपारी 2: 30 वाजता सुटणार आहे. या गाडीला अकोला, भोपाळ, झाशी, नवी दिल्ली आणि लुधियाना येथे थांबा दिला आहे.
गाडीमध्ये एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, अकरा द्वितीय श्रेणी, एक स्वयंपाकाची बोगी आणि दोन एसएलआर बोगी राहणार आहेत. गाडीचे आरक्षण फक्त इंटरनेटद्वारेच करता येईल तसेच कन्फर्म तिकीटच प्रवाशांना दिले जाणार आहे.
चार्ट तयार झाल्यावर शिल्लक तिकिटे गाडी सुटण्याच्या तारखेला तिकीट खिडकीवर देण्यात येतील. तिकीट आकारणीतच जेवणाच्या शुल्काचा समावेश आहे. गाडीचे तिकीट रद्द करता येणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रतिसाद पाहून गाडीच्या फेर्‍या वाढवल्या जातील. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डीआरयूसीसी सदस्य रमाकांत खंडेलवाल, रुपेश राठी, विदर्भ चेंबरचे अध्यक्ष कमलेश वोरा, अशोक डालमिया, उपाध्यक्ष विजय पनपालिया, निकेश गुप्ता यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.