आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण गव्हाणकर यांचा १२६२ मतांनी निसटता विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्यात१९९५ ला आलेल्या युतीच्या लाटेत काँग्रेससह सर्वच पक्ष भुईसपाट झाले. अनेक मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. बाळापूर मतदारसंघात मात्र भाजप-सेना युतीच्या उमेदवाराला विजयासाठी चांगलीच दमछाक करावी लागली. भारिप-बमसंचे सूर्यभान ढोमणे यांनी भाजपचे नारायण गव्हाणकर यांना चांगलेच जेरीस आणले. त्यामुळे नारायण गव्हाणकर यांना केवळ १२६२ मतांचीच आघाडी मिळाली.

१९९५ च्या निवडणुकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघात एकूण १९ उमेदवार मैदानात उतरले होते. परंपरागत राजकीय पक्षांसोबतच १३ अपक्षही मैदानात उतरले होते. परंतु, भारतीय जनता पक्षाचे नारायण गव्हाणकर भारिप-बमसंचे सूर्यभान ढोमणे यांच्यातच खऱ्या अर्थाने लढत झाली. मोतीराम लहाने यांना एकूण ३६ हजार ८४४ मते मिळाली, तर सूर्यभान ढोमणे यांना ३५ हजार ५८२ मते मिळाली. काँग्रेसचे अॅड. नातिकोद्दीन खतीब यांना केवळ २५ हजार ७५७ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण एक लाख ६४ हजार ६७४ मतदारांची नोंद होती. यापैकी एक लाख २७ हजार ५७१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यापैकी एक लाख २५ हजार ३२५ मते वैध ठरली. या निवडणुकीत अपक्षांसोबत हवसे-गवसे कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नसलेले राजकीय पक्षांनीही आपले उमेदवार मैदानात उतरवले होते.

मुस्लिम मते वळली भारिपकडे
बाळापूरमध्ये१९८५ पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसला मुस्लिम मतांसह बहुजन समाजाचे मतदान मिळाले. १९९० ला भाजपचे किसनराव राऊत यांनी काँग्रेसला ग्रहण लावले. त्यानंतर राऊत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत, काँग्रेसची वाट धरली. परंतु, १९८५, १९९० ला मुस्लिम लीगने उमेदवार दिला. त्या वेळी मुस्लिम मतांचे विभाजन झाले. १९९५ ला मात्र मुस्लिम लीगने उमेदवार दिला नाही. त्यामुळे मुस्लिम मते भारिप-बमसंकडे वळली.