आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी गुलाल लाँचिंग; चौकशी झाली सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मोदी गुलालाचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी लाँचिंग केल्याची घटना 14 मार्च रोजी शिवणी विमानतळावर घडली होती. या प्रकरणाची चौकशी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यामार्फत सुरू आहे. शासकीय कार्यालयात राजकीय पक्षांना कोणताही कार्यक्रम करता येत नाही; पण भाजपने शिवणी विमानळाच्या प्रतीक्षागृहात मोदी गुलालाचे लाँचिंग केले होते. गुलालाच्या पाकिटांचे वाटप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे सोपवली आहे. प्रा. खडसे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या ठिकाणी नेमके कोण होते व आचारसंहितेचा कसा भंग झाला, याची माहिती घेत आहेत.

विमानतळाच्या प्रतीक्षागृहात झाले होते लाँचिंग : शिवणी विमानतळाच्या प्रतीक्षागृहात खासदार संजय धोत्रे, आमदार पांडुरंग फुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणजित देशमुख, आमदार हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, हरीश आलिमचंदाणी, डॉ. जगन्नाथ ढोणे यांची या वेळी उपस्थिती होती.