आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Akola, Divya Marathi

नरेंद्र मोदी यांची अकोल्यात रविवारी विजय शंखनाद संकल्प सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांची विजय शंखनाद संकल्प सभा महानगरात रविवारी, 30 मार्चला सकाळी 9 वाजता स्थानिक क्रिकेट क्लब मैदानावर होत आहे. या महासभेची जय्यत तयारी भाजप सेना, रिपाइं महायुतीतर्फे करण्यात येत आहे.


नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी अकोला जिल्ह्यासह अमरावती, बुलडाणा, वाशिम येथून भाजप सर्मथक अकोल्यात येणार आहेत. विजय शंखनाद रॅली या प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यात नरेंद्र मोदी तब्बल 185 जनसभा घेणार आहेत. मोदी 30 मार्चला सकाळी अहमदाबाद येथून विमानाने अकोल्यात येणार असून, सकाळी 9 वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर उपस्थित राहतील. सभेची निर्धारित वेळ लक्षात घेता चार मतदारसंघांतील नागरिक, कार्यकर्ते, महिला पुरुष हजर राहणार असल्याने यासभेसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. अकोल्यातील उमेदवार संजय धोत्रे, वाशिमच्या भावना गवळी, बुलडाणाचे प्रतापराव जाधव आणि अमरावतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी अकोल्यात वैचारिक शंखनाद करणार आहे.