आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Panduranga Fundkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाचा विकास केवळ नरेंद्र मोदीच करू शकतात,पांडुरंग फुंडकर यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव - देशाला विकासाची दूरदृष्टी असलेला पंतप्रधान हवा आहे. ही क्षमता केवळ गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातच आहे. देशाचा विकास होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करा,असे आवाहन आमदार पांडुरंग फुंडकर यांनी केले.


शेगाव तालुक्यातील गौलखेड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यासाठी लोह आणि मातीचा संग्रह करण्यासाठी आयोजित उपक्रमात आमदार फुंडकर बोलत होते.


याप्रसंगी सरपंच ज्ञानदेव शेजोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग शेजोळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख, विजय भालतिलक, गोविंद मिरगे, धोडीराम घेंगे, राजेश श्रीनाथ, अँड.दिलीप पटोकार, राजेंद्र देवचे, प्रकाश भारसाकळे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी भाजपाच्या गौलखेड शाखेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयासाठी संग्रहीत केलेले लोह आणि माती आमदार भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे सोपवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल काळे यांनी केले. कार्यक्रमास गावातील नागरिक आणि भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.